रा.श्री. जोग यांची ओळख मर्मज्ञ समीक्षक अशी साहित्य विचारक्षेत्रात आहे. जोग यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ या ग्रंथाने मराठी साहित्य विचाराचा पाया घातला गेला. त्यांनी त्या ग्रंथात पाश्चिमात्य साहित्य, इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे संस्करण केले. जोग यांनी अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य विचाराला प्रदान केली...
कवी अनिल यांना मुक्तछंदाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांनी ‘दशपदी’ या नव्या काव्यप्रकाराचा आविष्कार केला. साधी, सरळ, भावस्पर्शी रचना आणि उत्कट गीतात्मता हे त्यांच्या कवितेचे वेगळेपण. मात्र, त्यांची कारकीर्द विविधतापूर्ण आहे…