Home Tags मंथन

Tag: मंथन

समुद्र प्रवास आणि कोरोना (Sailor Experience of Corona)

नाविक आम्ही फिरतो सात नभांखाली...बहुतेक लोकांना असे वाटते, की नाविक व्यक्तींचे जीवन मनमोहक असेल, त्यांना भरपूर जगभर फिरण्यास, भरपूर वाइन पिण्यास मिळत असेल आणि त्यासोबत पैसेही कमावता येत असतील! पण जसे म्हणतात, ना 'अज्ञानात आनंद आहे' तसेच हेही आहे

बडोद्यातील विनाशकारी प्लेग, 1896 (KILLER PLAGUE 1896 IN VADODARA)

'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर महाराष्ट्र व मराठी माणूस यांबाबतची विविध तऱ्हांची माहिती आपल्याला संकलित करायची आहे. काही ऐतिहासिक महत्त्वाचा डेटादेखील गावोगावाहून, स्थानिक पातळीवरील प्रयत्नांतून उपलब्ध होऊ शकतो.

स्थलांतर ऊर्फ घरवापसी! एक टर्निंग पॉइंट (Migration can be a Turning Point)

कोरोना व्हायरसमुळे लोकांची घरवापसी/स्थलांतर मोठ्या प्रमाणावार होत आहे. तो फार मोठा प्रश्न होणार आहे. मी त्या प्रश्नाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. वास्तवात इट्स रिस्टोरेशन इन रिअॅलिटी. मला मराठवाड्याच्या परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांची माहिती आहे. 

दुबईतील ईद झाली व्हर्च्युअल (Dubai, EId Goes Virtual)

जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. लोकांना त्याच्या बातम्या, हकिकती वर्तमानपत्रे, टीव्ही आणि समाजमाध्यमे यांवरून कळतात. पण त्या सर्वांवर वाचक/प्रेक्षकांचा विश्वास बसतो असे नव्हे. भारतातील हकिकती आपल्याला अन्य विविध मार्गांनीही कळत असतात.

देवाघरची बाळे (Gifted Children)

ठाण्याचे रंजन जोशी यांचे घरच चित्रकलेचे आहे. ते स्वतः, त्यांच्या पत्नी विद्या, दोघेही जे.जे. इंस्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये प्राध्यापक होते. त्यांचा मुलगा आदित्य, सून गौरी; ती दोघेही चित्रकलेचे शिक्षण घेऊन जाहिरातक्षेत्रात कामे करतात. आदित्य-गौरी यांची आठ वर्षांची छोटी मुलगी इरा हिला तिच्या खोलीत चित्रे काढण्यास एक भिंतच्या भिंत आहे

लंडन खूप दूर आहे… (Corona Experience in Britain)

कोरोनासंबंधात लंडन येथे राहत असलेल्या वेल्हाणकर व दळवी कुटुंबीयांशी संपर्क साधला. अमेय आणि तेजश्री वेल्हाणकर या पतिपत्नींनी तेथील माहिती दिली. पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये 29 जानेवारी 2020 रोजी आढळला. बरेच लोक डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत इटाली, ऑस्ट्रिया अशा युरोपीयन देशांत सहलीसाठी जातात.

वर्क फ्रॉम होम: एक कल्पनाविस्तार! (Work from Home Advantages)

कोरोना व्हायरस हे जगावर फार मोठे संकट ओढवले आहे; तितकेच ते मोठे आश्चर्य आहे आणि त्यातून भयानक अनुभव मिळत आहेत. घरामध्ये बंद राहणे ही कल्पना देशात आणीबाणी लावली गेली तेव्हाही एवढी कोणी अनुभवली नसावी. आख्खा देश असा बंद कोणी ना कधी पहिला ना अनुभवला! खेड्यापाड्यांत शहरांच्या एवढी भयानक परिस्थिती  नाही.

कोरोनाचा गुंता आणि विरोधाभास (Corona Paradox)

6
हातात टाटाचे बारीक मीठ घ्या. त्यातील एक कण बाजूला तळहातावर ठेवा. त्याच्यापेक्षा दहाहजार पटींनी लहान आहे कोरोनाचा विषाणू! असे लक्षावधी कण श्वासातून, खोकल्यातून वा शिंकेतून बाहेर पडणाऱ्या एका थेंबात (Aerosol) असतात. काहीवेळा तो थेंब तीन ते पाच फूटांपर्यंत खाली न पडता,

शिरपूर पॅटर्न पाणी चळवळ बनू शकेल? (Shirpur Pattern)

मे महिना संपत आला तरी या, 2020 साली पाणीटंचाईच्या, गावागावांना टँकरने पाणी पुरवल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत! त्यांची जागा कोरोनाने व्यापली आहे हे खरे; परंतु त्याचप्रमाणे, पाऊस 2019 साली सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत रेंगाळला होता. काही प्रदेशांत तर महापुराने थैमान घातले होते.

जलसंवर्धनाचे एकात्म व सुदृढ प्रयत्न हवेत! (Water Scarcity: Integrated Efforts Needed)

स्टॉकहोम जलपुरस्कार माधव चितळे यांना 1993 मध्ये मिळाला. तो नोबेल पुरस्कारच मानला जातो. तो भारतात प्रथमच मिळत होता, तोही मराठी माणसाला! त्यामुळे आम्ही 'विज्ञानग्रंथाली'तर्फे त्यांचा सत्कार व त्यांची मुलाखत असा कार्यक्रम मुंबईत योजला. भा.ल.महाबळ व मीना देवल यांनी मुलाखत घेतली.