शाळा कोरोनाच्या संकटामुळे अनेक दिवस बंद आहेत, तर मुलांच्या शिक्षणाचे काय होणार असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. कोणी कोणी ऑनलाइन क्लासेसचा विचार करतात, त्यांची फी ऐकून हैराण होतात. पण 'एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशन’ने (MKCLKF) 'ग्राममंगल'च्या मदतीने पहिली ते आठवीचे पाठ बनवून घेतले आहेत व ते दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दाखवले जात आहेत.