परिसंस्थेमध्ये जमिनीवरची झाडे आणि प्राणी जितके महत्त्वाचे, तितकेच पाण्याखालील वनस्पती आणि प्राणी यांचेही महत्त्व आहे. ती सृष्टी टिकवणे, त्यांतील घटकांचे संरक्षण करणे हे नैतिक कर्तव्य आहे. अशा घटकांना महत्त्व देणारे लोक दुर्लभ. मात्र, काही लोक आत्मीयतेने भवतालातील तशा घटकांचा सांभाळ करतात, त्यांची काळजी घेतात. कासवांच्या सात प्रजातींपैकी ऑलिव्ह रिडले नावाच्या कासवांचे संवर्धन करणारे कोकणातील वेळास नावाचे गाव आहे...