मोराणे सांडस हे माझे आजोळ; म्हणजे मामाचे गाव. ते नाशिक जिल्ह्याच्या सटाणा (बागलाण) या तालुक्यात आहे. मोराणे हे फड बागायती असणारे संपन्न गाव होते. हे टुमदार खेडे मोसम नदीच्या तीरावर वसले आहे. ते सटाणा या तालुक्याच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे...
होय. आम्ही वसईकर आहोत. कारण आमचा धर्म, गोत्र, जात, आर्थिक परिस्थिती, रंग, रूप, काहीही असले, तरी आम्हाला बांधते ते एकच नाते - आम्ही वसईकर ! भारत देश किती मोठा आणि विस्तीर्ण; आणि किती विविधतेने भरलेला आहे !
विल्यम् मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ treasurer, तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी...