वाडवळी ही उत्तर कोकणपट्टीतली प्रचलित बोली. कोंकणी, पोर्तुगीज, लॅटीन, फारसी, अरबी आणि मराठी अशा विविध भाषांमधले शब्द सामावून घेणारी ही एक मनोज्ञ बोलीभाषा आहे. या बोलीभाषेचा शब्दकोश मूळचे वसईचे असलेले आणि सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले रिचर्ड नुनीस यांनी संपादित केला आहे. मराठीला कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे त्या परंपरेत हा शब्दकोश मोलाची भर घालेल. या शब्दकोशाला डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेतला हा संपादित अंश...
वसईच्या एकूण लोकसमुदायामध्ये घाटी म्हणजे देशावरील माणसे बहुत आहेत. तशी पंचवीस हजारांपेक्षा जास्त कुटुंबे त्या भागात असावीत असा अंदाज आहे. ते लोक मुख्यत: सातारा जिल्ह्याच्या माणदेशातील आहेत. ते गेल्या दोन-तीन शतकांपासून तेथे वास्तव्यास येत गेलेले आहेत. ते लोक मेंढपाळ म्हणून भटकंती करत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम आले व पुढे येऊन वसईत स्थिरावले. वसई ही त्यांच्या पारंपरिक लोकगीतांमध्ये वत्सापूर, बांदुपुरा, बहादुरपुरा, गुलछनाबाद आणि बाजीपूर अशा नावांनी आलेली दिसते...
माझ्या मुरुड गावच्या गावकऱ्यांची भाषा अगदी रोखठोक ! ते बोलताना नाकाचा वापर करतात की काय, असे ऐकणाऱ्याला वाटेल. त्यांनी बरेचसे शब्द मोडून घेऊन मुखात बसवलेले आहेत. म्हणजे घ्यायचं, द्यायचं, करायचं असे म्हणायचे असेल तर ते घैचं, दैचं, कराचं असे बोलतात...
अचलपूरच्या सांस्कृतिक विश्वातील हरहुन्नरी हास्य कवी, कलाकार राजा धर्माधिकारी म्हणजे दिलखुलास गप्पांचा धबधबाच ! नर्म विनोदी कोट्या करून वातावरण हलकेफुलके करण्याची त्यांची लकब मनाला भावते. ते हातचे काही न राखता भरभरून बोलत असतात, तो वऱ्हाडी संभाषणाचा नमुनाच ठरून जातो...
पाखाडी हे पदपथ वा फूटपाथ यांचे एक रूप होय. सखल भागातून उंचावरच्या टेपाडावर जाण्या-येण्यासाठी दगडांनी बांधलेला रस्ता म्हणजे पाखाडी. त्या रस्त्याला फरसबंदी करण्यासाठी कोकणात मिळणाऱ्या जांभा दगडांचे चिरे वापरत. चार हजार वर्षांपूर्वी ग्रीकमधील नगररचनेत ते बांधण्याची पद्धत अवतरलेली दिसते. लंडनमध्ये सतराव्या शतकात रहदारीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी रस्त्यापासून किंचित उंच पदपथ बांधण्याची पद्धत रूढ झाली...
कोकणामध्ये कणकवली येथे भरलेल्या सिंचन विकास परिषदेतून गावाच्या परिसरात पूर्वी पाण्याच्या काय व्यवस्था असत ते स्पष्ट झाले. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन हजार पाणवठे होते. काही ठिकाणी बोगदे काढून पलीकडच्या घळीमधील पाणी वळवले गेले होते. त्या सर्व पाण्याच्या व्यवस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. पण त्यांच्या अवशेषांमधून एकंदर भारताच्या विविध भागांत समाजजीवनाची पाण्याच्या संदर्भातील व्यवस्था कशी होती याचे संकेत मिळतात...
स्वतःमधील क्षमतांचा परिचय करून घेणे, त्या दिशेने पुढे चालणे व जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण करणे म्हणजे शिक्षण ! ते शिक्षण नर्मदाघाटीत मेधा पाटकरांच्या जीवनशाळा देतात. त्यांच्या या उपक्रमामुळे मुले हातात शस्त्र न घेता जीवनशाळांमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत. योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन कशा प्रकारे समाजाची उन्नती साधू शकते हे जीवनशाळेला भेट दिल्यावर जाणवते...
मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन हे केवळ धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणे, या एका मुद्द्यापुरते सीमित नाही. या आंदोलनातील महत्त्वाची फलश्रुती म्हणजे मेधा पाटकर यांच्या व्यापक शिक्षणविषयक दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या जीवनशाळा. ‘लढाई और पढाई, साथ साथ’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या जीवनशाळा आंदोलनाचा प्राणवायू आहेत...
वडार बोली ही तेलगूमिश्रित आहे. वडार लोक भटकंती करतात, त्यामुळे प्रादेशिकतेचे रंगगंध त्या भाषेला लाभले आहेत. तिला स्वतंत्र लिपी नाही, ती जिवंत मौखिक स्वरूपात आहे. तिचा व्यवहारात सांकेतिक भाषा म्हणूनही वापर होताना दिसतो...
ज्या आईने मातृभाषा शिकवली तीच भाषा जर मुलगा विसरून गेला, तर मुलाचा परिवार, समाज, विद्या व देश यांच्याशी संबंध तुटतो. मातृभाषा विसरणे यासारखा दुसरा मोठा कोणताही शाप नाही !