पारोळा हे ‘मेरी झांसी नही दुंगी’ असे बाणेदार उद्गार काढणारी मर्दानी झाशीची राणी यांचे माहेर. तांबे हे त्यांचे माहेरचे आडनाव. त्यांचे वंशज पारोळ्यात राहत आहेत. कंगना राणावतने रंगवलेल्या ‘मणिकर्णिका' चित्रपटातील झाशीच्या राणीच्या तडाखेबंद भूमिकेने केवळ एकोणतीस वर्षे आयुष्य लाभलेल्या त्या मर्दानीचा इतिहास पुन्हा जगासमोर आला...