Tag: बैलगाडी
दापोलीचा प्रभुआळी उत्सव – परंपरेची मांदियाळी
प्रभुआळी हे दापोली शहराचे मध्यवर्ती ठिकाण. त्या आळीची ख्याती उत्सव, प्रथा-परंपरा यांचा वारसा जपणारा, गजबजलेला भाग म्हणून आहे. प्रभुआळी हे नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी प्रधान व सुळे हे प्रभू म्हणजे सीकेपी ग्रामस्थ यांचे वास्तव्य होते. या जुन्या संदर्भाखेरीज दुसरा महत्त्वाचा पदर आहे. तो म्हणजे आळीत असलेले ‘प्रभू’ श्रीरामचंद्राचे मंदिर ...
डॉ. एकनाथ गोळे – कोकणविकासाचा ध्यास !
डॉ. एकनाथ मधुसूदन गोळे हे मुंबईच्या दादरचे की दापोली तालुक्यातील हर्णेचे असा प्रश्न पडावा इतके ते या दोन्ही गावांशी एकरूप झालेले होते. त्यांनी रेडिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस मुंबईत केली, परंतु त्यांनी हर्णे-दापोलीच्या विकासाचा ध्यास आयुष्यभर घेतला. तसे अनेक उपक्रम त्यांनी त्या तालुक्यात केले...
बहिरमचं झगमग स्वप्न
ऋणमोचन आणि बहिरम या जत्रा वऱ्हाडीतील प्रसिद्ध म्हणाव्या अशा आहेत. लेखक मधुकर केचे यांनी बहिरमच्या यात्रेचे वेधक असे चित्रण त्यांच्या लेखनातून केले आहे. त्यांनी या जत्रेचे वर्णन सातपुड्याच्या पायथ्याशी महिनाभर मुक्कामाला येणारे एक झगमग स्वप्न असे केले आहे...
बैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना
शंभर वर्षांपूर्वी घोडागाडी, बैलगाडी चालवण्यासाठी परवान्याची सक्ती होती. तो परवाना जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सहीने दिला जाई. तसेच, घरात रेडिओ लावण्यासदेखील परवाना आवश्यक होता. त्याचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागे...
पळण (Running away from Village)
मी आईला विचारले, “आय, का आलो आपण इथं?” आईने थोडक्यात उत्तर दिले, “याला पळण म्हणतात.” मी प्रश्न विचारला, “पळण म्हणजे काय?” माझी आई मला माझ्या नावावरून लहानपणी देवके म्हणत असे. ती मला म्हणाली, “अगं देवके, आज आपल्या गावात हिंदू लोकं नवरात्रीच्या टायमाला देवीला बळी देतात. म्हणून आपण इथं आलो.”...
नामशेष होत असलेली लाकडी बैलगाडी
मी बैलगाडीचा जन्म कधी झाला ते सांगू शकत नाही. मात्र मी शेती करत असताना 1970 साली माझ्या वाडवडिलांपासून वापरात असलेली लाकडापासून, बनवलेली बैलगाडी नामशेष...