Tag: फलटण एज्युकेशन सोसायटी
फलटणचा संस्कृतिशोध !
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...
देविका घोरपडे फलटणची सुवर्णकन्या (Phaltan’s Boxer Devika Ghorpade)
देविका घोरपडे बॉक्सिंग स्पर्धेत अकरा सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. देविका इतिहासप्रसिद्ध संताजी घोरपडे यांची वंशज. वारसाहक्काने मिळालेले धाडस व मेहनती वृत्ती हे या सुवर्णकन्येच्या यशाचे गमक आहे...