जानोजी निंबाळकर हे केवळ समशेरीचे फर्जंद नव्हते, तर ते एक अव्वल रसिक राजकारणी होते आणि राजकारणी व्यक्तिमत्त्वाच्या ठिकाणी सहसा न आढळणारे साहित्यिक गुण त्यांच्या ठिकाणी वास करत होते, हे त्यांच्या पत्रात आलेल्या काव्यविभ्रमावरून स्पष्ट होते...
इतिहासाला मर्यादा आहे. तो माणसाच्या खोल अंतर्मनात शिरू शकत नाही; काव्य मात्र माणसाच्या अंतर्मनाचा वेध घेऊ शकते. म्हणूनच श्रीकृष्णाचे काव्य व बुद्धाचे मिथक माणसाला अंतरी खोलवर झेप घेण्यासाठी समर्थ करू शकते. पाश्चिमात्य लोक जेव्हा तुलसीदास वाचतात तेव्हा ते म्हणतात, की हा इतिहास नव्हे, कल्पित आहे ! बरोबरच आहे ते. तो इतिहास नाहीच आहे. कल्पितच आहे ते. तरीसुद्धा तुलसीदास हा कवी संत लूक याने ख्रिस्ताला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यापेक्षा अधिक न्याय श्रीरामाला देतो...
देवर्षी नारद यांना आद्य पत्रकार म्हणतात, कारण त्यांचा संचार त्रिभुवनात असे आणि त्यांचे लक्ष तिन्ही लोकांमध्ये कोठे काय घडत आहे यावर बारकाईने असे. जे...
विल्यम् मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ treasurer, तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी...