रिव्हर सिस्टिम ही भूगोलातील नवी संज्ञा. शाळेत नदीचा धडा म्हणजे माहीत असे, की उगम, टप्पे, खनन, वहन, भरण क्रिया आणि भूरूपे! नदीचे महत्त्व म्हणजे तिच्यापासून फक्त आणि फक्त माणसाला मिळवायच्या फायद्यांची यादी! आणि नंतर आला ‘Multidisciplinary Approach’? समर्थ रामदासांची उक्ती आहे- ‘भूगोळ आहे भूमंडळी’ आणि विश्वाची प्राचीनता हे प्रमाण मानले जाते माणसाच्या जगण्याचे.