Home Authors Posts by धोंडिराम दत्तात्रय पाटील

धोंडिराम दत्तात्रय पाटील

2 POSTS 0 COMMENTS
धोंडिराम दत्तात्रय पाटील हे सांगली जिल्ह्याच्या बिसूर गावचे. ते त्‍यांच्‍यावर शेती आणि माती यांचे संस्कार झाले असल्‍याचे सांगतात. त्‍यांनी शिवाजी विद्यापीठातून बी ए (हिंदी) बी.जे.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्‍यांना गारगोटीच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयात बी ए, बी एड करत असताना वाचन, लेखन आणि काव्यरचना यांचा छंद जडला. त्‍यांनी बी ए ची पदवी मिळवल्यावर त्‍यांना पत्रकारिता खुणावू लागली. त्यांनी पत्रकारितेत पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या अभ्यासाचे विषय पर्यावरण, इतिहास, संस्कृती, बदलते जनमानस, देशी खेळ असे आहेत. त्यांनी सायकलिंग करत केलेल्या स्थानिक प्रवासावर आधारीत शंभराहून अधिक लेख लिहिले आहेत. पाटील ‘अंनिस‘ चळवळीशी जोडलेले आहेत. त्‍यांनी गावात ‘लोकजागर’ मंच स्थापन करून त्याद्वारे लोकांचे प्रबोधन करण्‍याचा प्रयत्‍न केला.

सांगलीचे सायकलिंग जगाशी जोडलेले! (Bicycle is trending in Sangali)

सायकल हा नवा ट्रेंड समाजामध्ये तंदुरुस्तीसाठी म्हणून रुजत, वाढत आहे. सायकलस्वारी (सायकलिंग) हा खेळ, छंद, हौस म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. सायकल हे वाहन अनेक वाहनांच्या गलबल्यात स्थानिक प्रवास, छोट्या जा-ये करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरत असल्याची जाणीव पुन्हा जनमनावर ठसत आहे...
_Ashok_Jadhav_2.png

अशोक जाधव यांचे कलादालन

कलासक्त चित्रकार, काष्ठशिल्पकार अशोक दादू जाधव यांनी स्वतः आर्थिक झळ सोसून कलाप्रेम जोपासण्याचे धाडस चिंचोली गावात केले आहे. ते गाव सांगली जिल्‍ह्याच्‍या शिराळा तालुक्‍यात आहे....