Tag: परमात्मा
शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ
शंकराचार्य हे भारतीय संस्कृतीतील धर्मविचारांचे आद्यगुरू. शिवगुरु भट्ट व आर्याम्बा यांच्या पोटी शंकराचा प्रसाद म्हणून त्यांचा जन्म झाल्याची भावना मनी बाळगून त्यांचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. शंकर मेधावी होते. ते प्रकांडपंडित म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच ओळखले जाऊ लागले. त्यांना वयाच्या आठव्या वर्षी गुरू गोविंदांकडून संन्यास प्राप्त झाला. त्यांना आयुष्य केवळ बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांनी जवळपास चाळीस ग्रंथांची निर्मिती केली आहे...
श्रीमद्भागवत – परमसत्याच्या अनुभूतीसाठी !
‘श्रीमद्भागवत महापुराण’ ही रचना महर्षी वेदव्यास यांची आहे. अन्न-वस्त्र-निवारा या लौकिक गरजांपलीकडे मानवी जीवनाचे उद्दिष्ट आहे, ते म्हणजे परमसत्याचा शोध. त्याचा एक मार्ग म्हणजे विष्णुदेवतेच्या लीलांचे वर्णन ऐकणे. तेच भागवत ग्रंथाचे सार आहे. त्यात भक्ती, ज्ञान, वैराग्य व ध्यानयोग यांचे विवेचन केले गेले आहे. त्यामुळे त्यास भक्तिशास्त्राचा ग्रंथ असेही म्हणतात...