Tag: परंपरा
माझ्या आईच्या आत्म्याची यात्रा !
मनाची पोकळी खूपच मोठी असते. विश्वाच्या व्यापाएवढी. तशी ती भरून काढणे फार अवघड. मनुष्य कितीही विज्ञाननिष्ठ असला तरी तो कोठेतरी थांबतोच. त्याला अजून पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव असते- प्रसंगाप्रसंगाने होते. ती पोकळी भरून काढण्याची शक्ती ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर अवलंबून असते. काहींना श्रद्धा ह्या निरूपद्रवी अंधश्रद्धाच वाटतात. परंतु या श्रद्धा म्हणा- अंधश्रद्धा म्हणा, त्यांचा मनाला मोठा आधार असतो...
आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...
अचलपूर – त्राटिका वधाची नऊशे वर्षांची परंपरा
अचलपूरच्या जीवनपुरा भागातील बालाजी मंदिर उत्सवात समारोपाला सादर होणारे राम अवतार व त्राटिका वध हे ‘नाट्य’ त्या उत्सवाची खासीयत मानली जाते. त्या परंपरेस नऊशे वर्षे 2018 साली पूर्ण झाली. लोटांगणे घालण्याची परंपराही बालाजी मंदिरात आहे. भाविक-भक्त मंदिरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या सर्पीण नदीच्या पात्रापर्यंत लोटांगणे घालत जातात…
महाराष्ट्रीय मुसलमान त्रिशंकू स्थितीत (The Plight of Marathi Muslims in Maharashtra)
महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा मराठी असून संस्कृती महाराष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन करणारा कॉ. अमर शेख यांचा लेख ‘किर्लोस्कर’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आजच्या भाषिक आणि सांस्कृतिक जागृतीच्या काळात प्रसिद्ध झालेला हा लेख महत्त्वपूर्ण आहे, तथापि तो परिपूर्ण नाही...
वाघबारस – आदिवासींचे जीवन होते पावन!
दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत...
पळून चाललेय गाव, आचरे त्याचे नाव! (Aachre)
गावपळणीची प्रथा कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील आचरे पंचक्रोशीत आहे. आचऱ्याला लागून असलेल्या वायंगणी, चिंदर, मुणगे आदी गावांतही दर तीन ते चार वर्षांनी गावपळण...
महाराष्ट्रातील पहिला नवरात्रोत्सव
मुंबईच्या दादरमध्ये ‘शिवभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय ‘लोकहितवादी संघा’च्या माध्यमातून 1926 मध्ये घेण्यात आला. तो निर्णय लोकांना इतका आकर्षक वाटला, की कुलाबा...
वटपौर्णिमा
सुवासिनी भारतीय परंपरेनुसार सौभाग्यवृद्धीसाठी वटसावित्रीचे व्रत करतात. त्यास आधार सत्यवान-सावित्रीच्या पुराणकथेचा आहे. कथेनुसार सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी मोठ्या भक्तीने यमराजाला संतुष्ट केले....