Home Authors Posts by रामदास फुटाणे

रामदास फुटाणे

1 POSTS 0 COMMENTS
रामदास फुटाणे हे कवी, विडंबनकवी, वात्रटिकाकार आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी महाराष्ट्रभर कवितांचे कार्यक्रम केले आहेत. त्यांनी सामना, सर्वसाक्षी, सुर्वंता आणि सरपंच भगीरथ हे चार चित्रपट पडद्यावर आणले. ते जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कर्तृत्ववान मराठी बांधवांना एकत्र आणून 'शोध मराठी मनाचा' या संमेलनाची सुरुवात केली. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

माझ्या आईच्या आत्म्याची यात्रा !

मनाची पोकळी खूपच मोठी असते. विश्वाच्या व्यापाएवढी. तशी ती भरून काढणे फार अवघड. मनुष्य कितीही विज्ञाननिष्ठ असला तरी तो कोठेतरी थांबतोच. त्याला अजून पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव असते- प्रसंगाप्रसंगाने होते. ती पोकळी भरून काढण्याची शक्ती ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर अवलंबून असते. काहींना श्रद्धा ह्या निरूपद्रवी अंधश्रद्धाच वाटतात. परंतु या श्रद्धा म्हणा- अंधश्रद्धा म्हणा, त्यांचा मनाला मोठा आधार असतो...