भारत देशाच्या नकाशाच्या मधोमध असलेला हैदराबादचा प्रचंड मोठा भूभाग निजामाच्या ताब्यात होता. तो भारतात विलीन झाल्याविना भारताची अखंडता प्रस्थापित होणार नव्हती. भारताचे स्वातंत्र्य अधुरे राहणार होते. तसेच हैदराबाद संस्थान चोहोबाजूंनी भारत भूमीने वेढलेले होते. परंतु निजामाने या वास्तवतेचा विचार न करता स्वतंत्र राहण्याचा आग्रह धरला ! हैदराबाद संस्थानावर धर्माने मुसलमान असणाऱ्या मीर उस्मान अली खान निजाम याचे राज्य होते. तरी तेथील शहाऐंशी टक्के जनता हिंदू होती आणि ती बहुतांश जनता ‘भारतात विलीन व्हावे’ या मताची हाती. स्वतंत्र भारत सरकारची निजामाबरोबर अनेक बोलणी असफल झली तेव्हा भारताने ‘ऑपरेशन पोलो’ ही पोलिस कारवाई केली...