मलिक अहमदने भिंगारजवळ एक किल्ला आणि शहर वसवावे असे ठरवले. त्याप्रमाणे शहर आणि शहरातील वास्तू उभारण्यास 28 मे 1490 या दिवशी सुरुवात केली. अहमदनगर शहरातील तशा वास्तूंपैकी एक आहे फराहबक्ष महाल. त्याला नगरी भाषेत फऱ्याबाग किंवा फराहबाग म्हणून ओळखतात. ती नगरमधील सर्वांत मोठी ऐतिहासिक वास्तू आहे. ती वास्तू निजामशाहीतील वैभवशाली दिवसांची साक्ष आहे...
जानोजी निंबाळकर हे केवळ समशेरीचे फर्जंद नव्हते, तर ते एक अव्वल रसिक राजकारणी होते आणि राजकारणी व्यक्तिमत्त्वाच्या ठिकाणी सहसा न आढळणारे साहित्यिक गुण त्यांच्या ठिकाणी वास करत होते, हे त्यांच्या पत्रात आलेल्या काव्यविभ्रमावरून स्पष्ट होते...
महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत येत होता. देशात इतरत्र लोक परकीयांविरूद्ध लढत असताना मराठवाड्यातील जनतेला स्वकीयांच्या अत्याचाराला तोंड द्यावे लागत होते. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ या स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाड्यातील जनतेत त्या विरूद्ध जागृती निर्माण केली. त्या लढ्यात ग्रामीण भागातील एक अतिशय धाडसी महिला सहभागी झाली होती. तिचे नाव होते दगडाबाई देवराव शेळके...
सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर...