Home Tags नागपंचमी

Tag: नागपंचमी

ऐसे उगार माझे गाव ! (Ugar – My town)

उगार खुर्द हे भूतपूर्व सांगली संस्थानातील छोटेसे खेडेगाव. गाव स्वतंत्र भारतात गेल्या पाऊणशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे. मूलत: दक्षिणवाहिनी असणारी कृष्णा नदी उगारजवळ उत्तर वाहिनी होते. अशा वळणाला तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे नदीला प्रशस्त दगडी घाट वरपासून खाली, अगदी पात्राच्या मध्यभागापर्यंत आहे. शंभर वर्षे झाली तरी त्या घाटाचे बांधकाम अभंग आहे. उगार खुर्दला भाषिक सलगतेच्या तत्त्वावर सीमेलगतचे गाव म्हणून राज्य सरकारने भाषिक सवलती दिल्या आहेत...

अचलपूर – आधुनिक नाट्यपंढरी (Achalpur – The origin of Marathi stage)

अचलपूरला समृद्ध नाट्यपरंपरा लाभली आहे. विदर्भातील कालिदास आणि भवभूतींसारख्या नाट्य विभूतींनी नाट्यक्षेत्रात अजरामर कार्य केल्यानंतर तेथे आधुनिक रंगभूमी रुजली. अचलपुरातील बहुतेक नाट्यगृहे ही नाटके सादर करणाऱ्या मंडळांची स्वतःची आहेत. विशेष म्हणजे अचलपूरच्या जुन्या संस्था रंगमंचाची पूजा करताना नाटकांतील स्त्रीपात्रांचीही पूजा करत. कालौघात ती नाट्यगृहे नाहीशी झाली, पण नाट्यगृहांच्या समोरील मंदिरे जोरात चालू आहेत…

शिराळशेट (Shiral Sheth – Fictious Character Becomes Part of Folk Festival)

श्रीयाळ शेठ नावाचा अपभ्रंश शिराळ शेट, सक्रोबा, शंकरोबा असा महाराष्ट्राच्या विविध भागांत वेगवेगळा झालेला आढळतो. त्याला औट घटकेचा राजा असेही म्हटले जाते...