दापोलीच्या शैला(ताई) मंडलीक यांची जन्मशताब्दी 8 जानेवारी 2023 ला होऊन गेली. त्यांनी लोकसेवेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. त्या डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टच्या विश्वस्त होत्या. संपर्कात येणाऱ्या माणसाची अडचण सोडवण्यासाठी निरपेक्ष बुद्धीने प्रयत्न करणारी माणसे समाजात थोडी असतात. शैला तशांपैकी एक होत्या. बालपणी आईचे संस्कार, विवाहानंतर डॉ.आप्पा मंडलीक यांची साथ आणि थोरले दीर समाजवादी नेते डॉ. पी.व्ही. मंडलीक यांचे मार्गदर्शन... त्यामुळे शैला समाजकार्य खंबीर मनाने करू शकल्या...