संतांनी सर्वसामान्य लोकांना अध्यात्माची शिकवण सोप्या भाषेत देण्यासाठी ओवी, अभंग, भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यांतील रूपकात्मक आणि जनसमुदायासमोर नाट्यमय रीतीने सादर केली जाणारी रचना म्हणजे भारूड. एकनाथपूर्व काळात ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी तर एकनाथांच्या पश्चात तुकाराम आणि रामदास यांनीही भारूडे रचली. असे असले तरी एकनाथांची भारूडे सर्वांत लोकप्रिय झाली. त्यामुळेच ‘ओवी ज्ञानेशाची’, ‘अभंग तुकयाचा’ तसे ‘भारूड नाथांचं’ असे म्हटले जाते...