Home Tags जाखडी नृत्य

Tag: जाखडी नृत्य

कोकणची जाखडी, मॉरिशसची झाकरी (Konkan’s Jakhadi becomes Zhakari in Mauritius)

जाखडी म्हणजेच बाल्या नाच. ती कोकणातील लोककला आहे. त्याला ‘शक्ती-तुरा’ असे म्हणूनही ओळखले जाते. ‘जाखडी नृत्य’ रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांत विशेष प्रसिद्ध आहे. ते गौरीगणपतीच्या सणाला केले जाते. आश्चर्याचा भाग असा, की कोकणातून मॉरिशसला गेलेल्या व तेथे स्थिरावलेल्या मराठी लोकांनीही ती लोककला जपलेली आढळली. कोकणी लोक मॉरिशसमध्ये कामानिमित्त गेले, त्यास पावणेदोनशे वर्षे झाली. कोकणातील जाखडी नृत्य हे मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ या नावाने ओळखले जाते...

दापोलीचा प्रभुआळी उत्सव – परंपरेची मांदियाळी

1
प्रभुआळी हे दापोली शहराचे मध्यवर्ती ठिकाण. त्या आळीची ख्याती उत्सव, प्रथा-परंपरा यांचा वारसा जपणारा, गजबजलेला भाग म्हणून आहे. प्रभुआळी हे नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी प्रधान व सुळे हे प्रभू म्हणजे सीकेपी ग्रामस्थ यांचे वास्तव्य होते. या जुन्या संदर्भाखेरीज दुसरा महत्त्वाचा पदर आहे. तो म्हणजे आळीत असलेले ‘प्रभू’ श्रीरामचंद्राचे मंदिर ...

निलेश उजाळ यांना ओढ कविता-गीतांची

निलेश उजाळ यांनी ते चौथीत असताना काटकर वाडीच्या जाखडी नृत्यामधून गायकी सुरू केली. छोटा कलाकार गात आहे म्हणून पंचक्रोशीतील लोक त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी करत. गुरूंनी लिहिलेली गाणी गाणारा निलेश, पुढे स्वतः गाणी लिहू लागला. तेच निलेश उजाळ कवी, गीतकार म्हणून टीव्ही माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत...

दापोली तालुक्यातील शाहीर उदय काटकर

शाहीर उदय काटकर यांनी जाखडी नृत्याची छाप पहाडी आवाजाच्या जोरावर महाराष्ट्रभर उमटवली. त्यांचे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे वक्तृत्त्व आणि बहारदार गायकी लोकांच्या मनावर गारुड करते. उदय काटकर यांनी हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत...

हिरव्या डोंगरांनी वेढलेले पिसई

चहुबाजूंनी डोंगर आणि त्यांच्या मध्यात वसलेले गाव म्हणजे पिसई. अठरापगड जातीचे लोक गावात राहतात, तरी त्यांच्यामध्ये सामाजिक एकोपा आहे. हे गाव लोककलेच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. पिसईच्या गावकऱ्यांनी त्यांची लोकसंस्कृती टिकवून ठेवली आहे...
कोकणातील लोककला – जाखडी लोकनृत्य्

जाखडी नृत्य (बाल्या नाच)

कोकण प्रांतातील निसर्गसौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी नृत्य’. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. हा नाच उभ्‍याने केला जातो, म्‍हणून त्‍यास ‘जाखडी’ असे म्‍हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो - ‘जखडणे’. ‘जाखडी’मध्‍ये नृत्‍य करणार्‍यांची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्‍हटले जाते. मुंबई त ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्‍या नृत्याला, ‘बाल्या नाच’ असे नाव पडले...