झाडीपट्टी नाटकांचे स्टेज (रंगमंच) हा विषय कायम कुतूहलाचा राहिलेला आहे. किंबहुना झाडीपट्टीत खुद्द नाटक, त्यातील नटनट्या हे जसे आकर्षणाचे व चर्चेचे विषय असतात, त्याप्रमाणे रंगमंच – त्याची व्यवस्था - त्यावरील पडदे – त्यानुसार पात्रांच्या हालचाली हादेखील प्रेक्षकांच्या कुजबुजीचा विषय असतो.
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) हे शहर अलिकडे ‘झाडीवूड’ म्हणून नावारूपास येत आहे. मुंबईला जसे ‘बॉलिवूड’, तसे विदर्भाच्या झाडीपट्टीतील वडसा हे ‘झाडीवूड’. बॉलिवूड हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, तर झाडीवूड मात्र नाटकांसाठी.
झाडीबोलीच्या नाट्यकलेचा पिढीजात वारसा जपणारा उदापूरच्या मातीतील अवलिया म्हणजे अनिल नाकतोडे. त्यांचे वडील दाजीबा नाकतोडे हेही गावात होणाऱ्या नाटकांतून भूमिका साकारायचे.
सुरेश लोटलीकर हा हौशी व्यंगचित्रकार आहे. त्याचे विचार प्रगल्भ असतात आणि टिप्पणी मार्मिक. त्यामुळे तो अचूक वर्म पकडून व्यक्तीचे वा घटनेचे मर्म सूक्ष्मतेने चितारून टाकतो. त्या दृष्टीने त्याची राजकीय व्यंगचित्रे व अर्कचित्रे पाहण्यासारखी आहेत.
तुकडोजी महाराजांनीत्यांच्या हयातीत ग्रामगीतेचा प्रयोग करून भंडारा जिल्ह्यातील आमगाव ह्या, शहाण्णव घरे असलेल्या एका लहानशा खेड्याचे रुपांतर आदर्श आमगावात 1953 साली सर्वांच्या समन्वयाने करून दाखवले. प्रेमानुज नावाच्या लेखकाने आदर्श होण्यापूर्वीच्या आमगावचे वर्णन केले ते असे
हेमाद्रीपंडिताचे नाव ऐतिहासिक संदर्भात वारंवार येते. तो हेमाडपंत म्हणूनही ओळखला जातो. हेमाद्री पंडिताचे नाव बांधकाम शैली व मोडी लिपी या संदर्भात विशेष घेतले जाते. त्याने बांधलेली मंदिरे ‘हेमाडपंती’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
शिरपूर हे गाव चंद्रपूरहून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. ते यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात आहे. शिरपूर हे गाव प्राचीन आहे. त्या गावाची लोकसंख्या चार ते पाच हजार आहे. गावाच्या भोवताली चारगाव, वारगाव, शेलु, नवेगाव, वेडाबाई, मेंढोली, वारगाव,
आदिमानव राहत होता तो सुमारे सात ते दहा हजार वर्षांपूर्वीचा महापाषाणकाळ. त्यावेळी कोणत्याही आदिमानवाचा मृत्यू झाला, की त्याची आठवण म्हणून ज्या ठिकाणी त्याला गाडण्यात येई, त्या ठिकाणी फार मोठी दगडाची शिळा उभारली जात असे.
चंद्रपूर शहर नागपूरपासून दीडशे किलोमीटरवर आहे. चंद्रपूर हे ऐतिहासिक व पौराणिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. चंद्रपूरचा किल्ला जमिनीवरील किल्ला म्हणून नागपूर–विदर्भ प्रदेशात ओळखला जातो. त्या नगरीत पुराणांप्रमाणे सत् युगात कृतध्वजा सुनंद,
झाडीपट्टी रंगभूमीला एकशेबत्तीस वर्षें पूर्ण झाली आहेत. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांची ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळख आहे. त्या प्रदेशांत हिरव्याकंच झाडीने, जंगलांनी व्याप्त निसर्गाची लयलूट आहे.