वाडवळी ही उत्तर कोकणपट्टीतली प्रचलित बोली. कोंकणी, पोर्तुगीज, लॅटीन, फारसी, अरबी आणि मराठी अशा विविध भाषांमधले शब्द सामावून घेणारी ही एक मनोज्ञ बोलीभाषा आहे. या बोलीभाषेचा शब्दकोश मूळचे वसईचे असलेले आणि सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले रिचर्ड नुनीस यांनी संपादित केला आहे. मराठीला कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे त्या परंपरेत हा शब्दकोश मोलाची भर घालेल. या शब्दकोशाला डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेतला हा संपादित अंश...