Home Tags कोडजाई नदी

Tag: कोडजाई नदी

भोपण गावाला निसर्गाचा वरदहस्त

0
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील भोपण हे छोटेसे गाव खाडीकाठाला वसलेले आहे. भोपण्या नावाची व्यक्ती या गावात फार पूर्वी होऊन गेली, म्हणे ! त्यांच्या नावावरून गावाचे नाव भोपण असे पडले असावे. गावात मुख्य वाड्या तीन आहेत आणि त्यांत छोट्या छोट्या वाड्या अनेक आहेत. गावाची ग्रामदेवता 'शिंदगणकरीन' ही देवी आहे. गावात गावदेवीचे जुने मंदिर आहे. तिच्या मंदिरात मुख्य देवीसोबत भैरी, वरदान आणि कालकाई या देवतांच्या मूर्तीदेखील आहेत. उत्सव दरवर्षी, शिमग्याच्या वेळी आणि नवरात्रात होतो. देवीमंदिराशिवाय गावाच्या विठ्ठलवाडीमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे तर हरेकरवाडीमध्ये हनुमान मंदिर आहे...

प्रणालक, पद्मनाभ, पन्हाळेकाजी… दुर्ग एकच ! (Panhalekaji – Fort with many names)

दापोली तालुक्यातील दाभोळ या जुन्या बंदरातून मालाची आयातनिर्यात मोठ्या प्रमाणात अनेक शतके होत आलेली आहे. बंदरापर्यंत मालाची नेआण पश्चिम घाटापासूनच्या विविध भूप्रदेशांतून नदीमार्गानेदेखील होत असे. त्या मार्गांवरील वाहतुकीचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी किल्ले बांधले. प्रणालक ऊर्फ पद्मनाभ ऊर्फ पन्हाळेकाजी हा छोटेखानी किल्ला त्यांपैकीच एक ...