Tag: कासव महोत्सव
आगोम : निरामय सूक्ष्म औषधांचा वसा (Story of ‘Agom’ medicines)
ही गोष्ट आहे 1994 सालची. ‘गुटिका केशरंजना’ची धून आकाशवाणीवरून सकाळी सहा वाजता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुंजू लागली आणि ‘आगोम’ हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोचले ! ‘आगोम’चे गूढ त्याच्या नावापासून सुरू होते, पण लोक आकृष्ट झाले ते त्या गुटिकेमुळे, ‘डोक्याचे केस शाबूत राहतात’ या प्रभावाने. ‘आगोम’ हे औषधालय रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी एका छोट्याशा खेड्यात वसले आहे. दापोली तालुक्यातील कोळथरे हे ते गाव. ते सध्या कासव महोत्सवामुळेही गाजत आहे...
कोकण किनाऱ्यावरील कासवे – वाळूवरल्या खुणा (Turtles on the Konkan Coast – Marks on...
परिसंस्थेमध्ये जमिनीवरची झाडे आणि प्राणी जितके महत्त्वाचे, तितकेच पाण्याखालील वनस्पती आणि प्राणी यांचेही महत्त्व आहे. ती सृष्टी टिकवणे, त्यांतील घटकांचे संरक्षण करणे हे नैतिक कर्तव्य आहे. अशा घटकांना महत्त्व देणारे लोक दुर्लभ. मात्र, काही लोक आत्मीयतेने भवतालातील तशा घटकांचा सांभाळ करतात, त्यांची काळजी घेतात. कासवांच्या सात प्रजातींपैकी ऑलिव्ह रिडले नावाच्या कासवांचे संवर्धन करणारे कोकणातील वेळास नावाचे गाव आहे...
कासव महोत्सव – कोकणचे नवे आकर्षण ! (Kokan’s Turtle Festival)
कोकणात धार्मिक महोत्सव भरपूर. जुन्या प्रथा-परंपरा घट्ट रुजलेल्या. त्यात नव्या अभिनव अशा कासव महोत्सवाची गेल्या दोन दशकांत भर पडली आहे. तो महोत्सव नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांत साजरा होत असतो. ते कोकणचे नवे आकर्षण बनले आहे...