Tag: कालमापन
कालगणनेसाठी पंचांगांचा विकास (Astronomy, Astrology and Religion)
पंचांग ही भारताची संस्कृती आहे. भारतीय पूर्वज आकाश निरीक्षण करणारे, खगोल गणित जाणणारे होते. त्यांनी त्या ज्ञानाचा वापर करून त्यांचे आयुष्य निसर्ग नियमात अधिकाधिक बसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोकांचे धार्मिक आचरण निसर्गाच्या नियमांधारे आणि आयुर्वेदाच्या माध्यमाने जोडले गेले. परंतु धर्मशास्त्रात कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे. पंचांगकर्ते, धर्मशास्त्र जाणकार, आयुर्वेद तज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ यांनी एकत्रितपणे येऊन ते बदल केले व तसे सर्वांना समजावून सांगितले तर लोक त्यांचा नक्की स्वीकार करतील...