शेगावचे मूळ नाव शिवगाव. ते शिवगाव असे तेथील प्रसिद्ध शिवमंदिरामुळे प्रथम पडले. त्या शिवगावचे झाले शेगाव. शृंग ऋषींनी वसवलेले गाव म्हणून शेगाव अशीही एक व्युत्पत्ती आहे. शेगाव हे वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यातील गाव. ते तालुक्याचे ठिकाण आहे. संत गजानन महाराज तेथे आल्यामुळे शेगावला देशभर अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. शेगाव नगरी म्हणजे शिस्त, स्वच्छता आणि सुंदर नियोजनाचे उत्तम उदाहरण...