Home Tags कर्नाटक

Tag: कर्नाटक

दशावतारी नाटक (Dashavtari – Traditional Marathi Theatre Form)

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेअडतीस दशावतारी मंडळे आहेत. इतर लोककला काळाच्या उदरात गडप होत असताना, दशावतार मात्र अस्तित्व टिकवून आहे. अब्दुल नदाफ सारख्या नव्या नटांमुळे या कलाप्रकाराचे औत्सुक्य वाढत आहे...

अण्णासाहेब किर्लोस्कर आणि संगीत शाकुंतल (Annasaheb Kirloskar And Sangeet Shakuntal)

अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी मराठी संगीत नाटकाचे एक युग घडवले ! त्यांना नाटकांचा छंद जडला आणि त्यांचा विद्याभ्यास संपला. अण्णासाहेबांनी कालिदासांच्या संस्कृत शाकुंतल वरून मराठीत लिहिलेल्या ‘संगीत शाकुंतल’ने मराठी संगीत नाटकांची नांदी केली आणि इतिहास घडवला. त्यांनी आणि त्यांच्या किर्लोस्कर नाटक मंडळीने नाट्य व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली…

साम्यवाद कधीच मेला आहे

साम्यवाद कधीच मेला आहे ! त्याची मुख्य सूत्रे दोन होती- 1.राजकीय सत्ता फक्त कामगारवर्गाच्या हातात असावी, 2. उत्पादनाची सर्व साधने समाजाच्या मालकीची असावीत...

चौतिसावे मराठी साहित्य संमेलन (Thirty fourth Marathi Literary Meet – 1951)

चौतिसावे मराठी साहित्य संमेलन कर्नाटकात कारवार येथे 1951 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष अनंत काकबा प्रियोळकर हे होते. त्यांची ख्याती चिकित्सक संशोधक, प्राचीन वाङ्मयाचे विचक्षण अभ्यासक, दुर्मीळ ग्रंथांचे साक्षेपी संपादक अशी होती. ते भाषाशास्त्रज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते. पाठचिकित्सा शास्त्रातील सखोल संशोधन हा त्यांचा विशेष प्रांत...

अजिंठ्यात दडलेले ऐतिहासिक रहस्य – डॉ. वॉल्टर स्पिंक (Walter Spink rewrote history of art...

अजिंठा लेण्यांची सर्वाधिक ख्याती तेथील गुहांमधील रंगीत भित्तिचित्रांसाठी आहे. त्या लेणीसमूहात तीसपैकी फक्त पाच लेणी पूर्णपणे चित्रांकित आहेत. तीन लेण्यांमधील रंगचित्रे अर्धवट राहिलेली आहेत...

शेषराव घाटगे – पत्रे, देशभक्ताची व प्रेमवीराची (Patriot Sheshrao Ghatage)

शेषराव घाटगे यांच्या आयुष्याची चित्तरकथा मोठी रोमांचकारक आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. त्यांच्या चरित्रसाधनांवर 2011 ते 2012 या शताब्दी वर्षात प्रकाश पडला! त्यांचा चरित्रग्रंथ एकशेदोन वर्षांनी (मरणोत्तर एकोणसत्तर वर्षांनी) प्रसिद्ध झाला...
carasole

श्रीक्षेत्र वरदपूर

वरदपूर हे कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील सागर तालुक्यातील गाव. ते ‘वरदहळ्ळी’ या कानडी नावानेही ओळखले जाते. त्या ठिकाणी श्रीधर स्वामी यांची समाधी व आश्रम आहे....
carasole

गायिका-नटी अमीरबाई कर्नाटकी

अमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्‍यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात...