Tag: कर्जत
गोरक्ष ट्रेकिंग: प्रस्तरारोहकांचे आकर्षण
गोरक्ष किल्ला हा दोन हजार एकशेसदतीस फूट उंचीचा असून तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. तो ठाणे जिल्ह्याच्या कर्जत डोंगररांगेत मोडतो. तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. गोरक्ष किल्ला हा मुंबईकरांना आणि पुणेकरांना एका दिवसात करता येण्याजोगा आहे. गोरक्ष आणि मच्छिंद्रगड यांना ऐतिहासिक वारसा नाही तरी त्यांच्या सुळक्यांचे प्रस्तरारोहकांना मात्र आकर्षण वाटते. त्या गडाला महत्त्व शहाजी राजांच्या काळात होते; मात्र तेथे लढाई झाल्याचा उल्लेख नाही. गडाचा उपयोग शिवकालात आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे...
कर्जतचा एव्हरेस्टवीर संतोष दगडे (Karjat youth climbs Everest peak)
संतोष लक्ष्मण दगडे हे रायगड जिल्ह्यातील कर्जतचे तरुण गिर्यारोहक 17 मे 2023 रोजी पहाटे एक वाजून पंचावन्न मिनिटांनी एव्हरेस्टवर पोचले ! महाराष्ट्राच्या या युवकाने या पराक्रमामुळे साऱ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांच्यासारखे दिग्गज जेथे पोचले तेथे मराठमोळे संतोष जीवाची बाजी लावून पोचले होते...
आबासाहेब काकडे : क्रांतिकार्यातून विधायकतेकडे (Abasaheb Kakade : Work to educational activity)
स्वातंत्र्यानंतर पहिला प्रश्न उभा राहिला तो आम जनांना शिक्षणाचा. बहुजन समाजातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित होती. ती उच्चभ्रू सुशिक्षित समाजाकडून नाडली जात होती. आबासाहेबांच्या मनात कार्य करण्याची सामाजिक जाण होती. त्यांनी ‘दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लिग, शेवगाव’ या संस्थेची स्थापना केली ! त्यांनी स्वतःच्या वाड्यात शेवगावच्या जैन गल्लीत मुलांचे पहिले वसतिगृह 1954 मध्ये सुरू केले. त्यांनी त्या वसतिगृहास ‘श्री संत गाडगे महाराज’ यांचे नाव दिले...
माझी संस्था- आबासाहेब काकडे शिक्षण समूह, शेवगाव
शेवगावच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री आबासाहेब काकडे यांनी आणली. त्यांना विद्येचे, शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. त्यांचे राहणे खेड्यातील पण दृष्टी आधुनिक जगाची होती. त्यांनी ‘माझी संस्था’ ची स्थापना 6 मार्च 1953 रोजी केली आणि तिचे जाळे सारा तालुका आणि जिल्ह्यात काही भागात विणले. साठ वर्षांत शिक्षणाच्या त्या बीजाचा वटवृक्ष झाला आहे. ती संस्था आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह म्हणून ओळखली जाते...
देगावच्या विवेकवादी समाजसेविका: स्मिता जोशी
स्मिता जोशी या सर्वसामान्य शिक्षिकेने तळागाळातील वंचित आदिवासी समाजासाठी अठ्ठावीस वर्षे सातत्याने काम केले, ही त्यांची ओळख. त्यांनी 15 ऑगस्ट 1981 रोजी कर्जतजवळील कोंदिवडे या गावी ‘बांधिलकी’ ही सेवाभावी संस्था स्थापन केली. त्यांनी ‘बांधिलकी’चे काम स्त्रीला शिक्षित करणे, तिचे वैचारिक प्रबोधन करणे व तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या त्रिसूत्रीवर उभे केले, स्थिर केले व फुलवले...