Tag: आशिया खंड
निढळाच्या घामाची नगरी – धारावी (A City of Hard Working People)
आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी हे बिरुद (!) मिरवणारी धारावी ही झोपडपट्टी. सुरुवातीला ती मुंबई शहराच्या शीवेच्या म्हणजे सायनच्या बाहेर होती. पाण्याने एखाद्या बेटाला विळखा घालून पुढे जावे, तसे मुंबई शहर धारावीला विळखा घालून पुढे सरकत गेले. धारावी आता वाढत्या शहराच्या मध्यावर आली आहे. तो कष्टकऱ्यांचा मिनीभारतच आहे ! भारतभरच्या सगळ्या प्रांतांमधील विविध भाषा बोलणारे, वेगवेगळ्या धर्मांचे, पंथांचे लोक तेथे वस्ती करून आहेत. घेट्टो करून रहाणं ही माणसांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यामुळे एकच व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या प्रांतनिहाय वस्त्या धारावीत आहेत. धारावीने मुंबईच्या मध्यभागी जवळपास सहाशे एकर जमीन व्यापली आहे. सध्याच्या काळात जमिनीला आलेले मोल कोणाला सांगायला नको...
कमला निंबकर – व्यवसायोपचाराच्या प्रवर्तक (Pioneer of occupational therapy in India)
व्यवसायोपचाराचे तंत्र भारतातच नव्हे तर आशियातही प्रथम आणले ते कमलाबाई निंबकर यांनी. त्या अमेरिकन जन्माच्या भारताच्या स्नुषा. विष्णुपंत निंबकर यांनी त्यांच्याशी लग्न करण्याचे ठरवले. कमलाबाईंनी भारतात येऊन राहायचे आणि त्यांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा फायदा नव्या देशाला करून द्यायचा हे नवराबायकोंत आधीच ठरले होते. कमलाबाईंनी नवऱ्याबरोबर केलेल्या त्या कराराचे तंतोतंत पालन केले ! त्यांनी त्याही पुढे जाऊन, भारतात गरज कशाची आहे ते पाहून, त्याचे प्रशिक्षण घेऊन त्याचा प्रचार व प्रसार भारतात केला. विष्णुपंतांनी त्यांना त्यांच्या त्या सगळ्या कामांत पूर्ण पाठिंबा कायमच दिला...
शेवगाव पक्षी निरीक्षणातील कॅमेऱ्यात मगरीचे शेपूट
पैठणचे जायकवाडी धरण शेवगावपासून (नगर जिल्हा) अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथे हजारो स्थलांतरित पक्षी दरवर्षी येत असतात. म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी आवश्यक ती भौगोलिक परिस्थिती शेवगावापासून हाकेच्या अंतरावर तयार झाली आहे. तिचा लाभ सभोवतालच्या खेड्या-शहरांतील लोक आनंदाने घेत असतात. खरे तर, नाथसागर जलाशयाचा सर्व भाग हा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे...