Home Authors Posts by मंजिरी निंबकर

मंजिरी निंबकर

3 POSTS 0 COMMENTS
डॉ. मंजिरी निंबकर यांनी एम बी बी एस ही पदवी 1981 मध्ये मिळवली आणि फलटणच्या आर्थिकदृष्ट्या मागास वस्तीत प्रॅक्टिस सुरु केली. त्या अचूक निदान आणि माफक फी या गोष्टींसाठी ओळखल्या जात. त्यांनी विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी 1985 मध्ये शाळा सुरु करून ती चार वर्षे चालवली. त्यांनी डॉ. मॅक्सिन बर्नसन यांनी सुरु केलेल्या प्रगत शिक्षण संस्थेच्या ‘कमला निंबकर बालभवन’ या प्रयोगशील शाळेत काम करण्यास 1995 मध्ये सुरुवात केली. त्यांनी त्या शाळेची मुख्याध्यापक, खजिनदार व संचालक म्हणून अनेक वर्षे धुरा वाहिली. त्यांना सातारा जिल्हा माध्यमिक निवृत्त मुख्याध्यापक मंडळाकडून आदर्श मुख्याध्यापक म्हणून बॅरिस्टर पी.जी. पाटील मेमोरिअल पुरस्कार 2006 मध्ये देण्यात आला. त्यांनी अनेक मराठी तसेच इंग्रजी मासिके व वर्तमानपत्रांमधून शिक्षणविषयक लेख लिहिले आहेत. त्यांचे मुलांच्या लेखनावर आधारित ‘मुलांचे सृजनात्मक लिखाण’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

मॅक्सिन बर्नसन – शिक्षणातील दीपस्तंभ (Maxine Berntsen – Life long efforts for model school)

मॅक्सिन बर्नसन या नॉर्वेजिअन अमेरिकन विदुषी तरुण वयात भारतात आल्या आणि भारताच्याच झाल्या. त्यांचे शिक्षण क्षेत्रात काम मोलाचे समजले जाते. मॅक्सिन बर्नसन या त्यांच्या पीएच डी च्या अभ्यासाची तयारी करत असताना त्यांच्या कॉलेजमध्ये इरावती कर्वे व्याख्यान दौऱ्यावर आल्या होत्या. इरावती कर्वे यांनी त्यांना फलटणला जाण्यास सुचवले. तेथे त्यांची मुलगी जाई निंबकर राहत असे. म्हणून त्या फलटण या गावी 1966 साली आल्या. तीच मॅक्सिनबाईंची कार्यभूमीही झाली !

कमला निंबकर – व्यवसायोपचाराच्या प्रवर्तक (Pioneer of occupational therapy in India)

व्यवसायोपचाराचे तंत्र भारतातच नव्हे तर आशियातही प्रथम आणले ते कमलाबाई निंबकर यांनी. त्या अमेरिकन जन्माच्या भारताच्या स्नुषा. विष्णुपंत निंबकर यांनी त्यांच्याशी लग्न करण्याचे ठरवले. कमलाबाईंनी भारतात येऊन राहायचे आणि त्यांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा फायदा नव्या देशाला करून द्यायचा हे नवराबायकोंत आधीच ठरले होते. कमलाबाईंनी नवऱ्याबरोबर केलेल्या त्या कराराचे तंतोतंत पालन केले ! त्यांनी त्याही पुढे जाऊन, भारतात गरज कशाची आहे ते पाहून, त्याचे प्रशिक्षण घेऊन त्याचा प्रचार व प्रसार भारतात केला. विष्णुपंतांनी त्यांना त्यांच्या त्या सगळ्या कामांत पूर्ण पाठिंबा कायमच दिला...

व्यवसायोपचार (Occupational Therapy)

व्यवसायोपचार हा रुग्णाला त्याच्या स्वत:च्या पायावर उभा करतो. त्याला जीवन जगण्याची जिद्द देतो. शारीरिक अथवा मानसिक दृष्ट्या अपंग असणाऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तज्ज्ञांनी वैद्यकशास्त्राच्या सूचनेनुसार विकसित केलेल्या विकासात्मक कृतींद्वारे दिला जाणारा उपचार म्हणजे व्यवसायोपचार. विशिष्ट अवयवाला व्यायाम देण्यासाठी त्या उपचार पद्धतीत एखाद्या व्यवसायाची निवड केली जाते...