बाबासाहेब देशमुख यांनी अचलपूर शहरात गेल्या शतकारंभी अनेक संस्था स्थापन केल्या, त्यांतील पहिली ‘सार्वजनिक वाचनालय’ ही होय. त्या संस्थेचा स्थापना दिनांक उपलब्ध नाही. मात्र वाचनालयाच्या सध्याच्या इमारतीची जागा स्थानिक नगरपालिकेने 1893 साली वाचनालयास दिल्याचा उल्लेख आहे. वाचनालयास शहराच्या मध्यभागात प्रशस्त जागा मिळाली, परंतु साजेशी इमारत नव्हती. त्याकरता बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः बरीच वर्षे वाचनालयाचे काम पाहिले...