Tag: आचार्य विनोबा भावे
बाळकोबा भावे – विनोबांचे अनुज
बाळकोबा हे विनोबा भावे यांचे धाकटे बंधू. त्यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झाले होते. ते गांधीजींच्या उरळी कांचन या निसर्गोपचार आश्रमाचे शिल्पकार म्हणून त्यांचा लौकीक मोठा आहे. त्यांनी ब्रह्मसूत्र व पातंजल योगदर्शन यांसारख्या ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यांनी त्यांतील अनावश्यक भाग वगळला व ग्रंथाचा नवा आशय प्रतिपादित केला. त्यांनी गीतेवरही विस्तृत भाष्य लिहिले आहे. बाळकोबांनी गांधीजी आणि विनोबा यांच्या तत्त्वज्ञानाचे स्वतंत्र आकलन मांडले आहे. त्यांनी ‘अभंग व्रते’ या शीर्षकाने विस्तृत ग्रंथ लिहिला. गांधीजींची एकादश व्रते आणि विनोबांनी त्यावर लिहिलेले पद्यबद्ध निरुपण हा त्या ग्रंथाचा विषय आहे...
विनोबा- स्वरूपातून विश्वरूप !
अहिंसा आणि मानवी हक्क यावर नितांत विश्वास असलेले विनोबा भावे. त्यांना लोकांनी आचार्य ही पदवी दिली. ते त्यांच्या लेखणातून त्यांच्या जीवनाचे, आयुष्याचे त्यातील अनेक अंगाचे स्वरूप दाखवून आपल्याला विचारमग्न करतात, विचारांचा रस्ता दाखवतात. त्यांचे विचार आजच्या काळातही सोप्या भाषेत, उदाहरणे देऊन आपल्याला शिकवण देतात. विनोबाजींच्या विचारांचा मागोवा हेमंत मोने यांनी त्यांच्याबरोबर पत्ररूप संवादाने घेतला आहे...
शेवगावचे रमेशसर – विविधांगी कर्तृत्व
शेवगावचे रमेश भारदे यांना शिक्षणसम्राट होणे सहज शक्य होते, तसे राजकीय संबंधही त्यांचे होते; पण ते शिक्षक झाले ! आणि नंतर सेवाभाव, ध्येयनिष्ठ असे शिक्षणसंस्था चालक बनले. त्यांच्या या कर्तबगारीचा केवळ शेवगाव नव्हे तर नगर जिल्ह्यावर एक वेगळा ठसा उमटला आहे. रमेश भारदे यांनी ज्ञानदानाचे व्रत अखंड जपले...
मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...