स्थलांतर करावे लागू नये म्हणून भारतीय पूर्वजांनी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी उंचावर, पठारांवर तलावांची निर्मिती करून ठेवली. त्या ठिकाणी पाणी साठवून, त्या त्या ठिकाणच्या प्राणी जीवनाला, मानवी जीवनाला आधार दिला. भारत देशात पाच लाख खेडी होती, म्हणजे साधारणतः प्रत्येक गावाला कमीत कमी दोन तलाव होते! भारतीय जीवन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तलावांच्या काठी वाढलेले आहे...