कुमशेत हे नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील आदिवासी खेडे. ते तालुक्याच्या गावापासून पासष्ट किलोमीटर उंचीवर आहे आणि नगरपासून एकशेनव्वद किलोमीटर दूर. टेकडीवर वसलेले ते गाव, सभोवताली खोल दऱ्या, भोवती जंगल आणि श्वापदे.
नगरी बोली ही ठळकपणे उठून दिसणारी नाही; पण तिच्यात स्वतःचे असे वेगळेपण आहे. अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरीया मराठीच्या बोलींना जसे स्थान लाभले तसे नगरी बोलीला मिळालेले नाही. पण ‘काय करू राह्यला?’,
महाराष्ट्रातील ‘हेमाडपंती’ मंदिरे म्हणजे मध्ययुगीन भारताचे सांस्कृतिक संचित आहे. ती राज्यात विविध ठिकाणी आढळतात. इंग्रजी लेखक आल्डस हक्सले यांनी म्हटले आहे, की “त्या भव्य मंदिरांच्या पुढे जगातील महदाश्चर्य म्हणून गाजलेला ताजमहालही कलेच्या दृष्टीने सर्वसामान्य ठरेल!”
दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो त्यांनी वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा मोठा दिवस असतो. अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात तर ‘वाघबारस’ साजरी करण्याची परंपरा अनोखी आहे. आदिवासी बांधवांनी ती जपलीही नेकीने आहे. अकोले तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर वाघोबाची मंदिरे आहेत...
चोवीस तास, बारा महिने, तीनशेपासष्ट दिवस... सर्व ऋतूंत, अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडी अजमावयाची असेल, निळेभोर-स्वच्छ आकाश पाहायचे असेल, एकाच ठिकाणी...