Tag: शिक्षण
न्या केशवराव कोरटकर – हैदराबाद लढ्यातील मवाळ कार्यकर्ते (Justice Keshavrao Koratkar – An Activist...
न्यायमूर्ती केशवराव कोरटकर (1867-1932) हे हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यातील मवाळ कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांनी बजावलेली कामगिरी शतकभराहून अधिक काळ हैदराबाद शहरी दृगोचर होत आली आहे. त्यांपैकी दोन संस्था म्हणजे विवेकवर्धिनी शिक्षणसमूह आणि महाराष्ट्र साहित्य परिषद. केशवरावांचा जन्म गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. ते निजाम राज्यात मुख्य न्यायाधीशपदापर्यंत स्वकर्तृत्वावर पोचले होते...
आधुनिक फलटणचे शिल्पकार – मुधोजीराजे
मुधोजीराजे यांच्याकडे फलटण संस्थानाची गादी 10 फेब्रुवारी 1860 रोजी आली. मुधोजीराजे हे कार्यक्षम आणि तळमळीचे राजे होते. त्यांनी फलटणला एक आदर्श संस्थान 1860 ते 1916 या कालावधीत बनवले. मुधोजीराजे हे विसाव्या शतकातील पहिले राजे. महाराष्ट्रात आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला त्या काळात आरंभ झाला होता. इंग्रजी शिक्षण घेतलेले नवशिक्षित, सुधारकी विचारांचे तरुण समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या खटपटीत होते. मुधोजीराजांनी बदलत्या काळाची पावले ओळखून संस्थानात बदल सुरू केले. त्यांच्या काळात फलटणच्या आधुनिकीकरणाचा पाया घातला गेला...
पद्मा पिंपळीकर – अचलपुरावरील अमीट ठसा
पद्मा अनंत पिंपळीकर अचलपूरात राहत नाहीत. त्यांनी ते गाव सोडले व त्या लेकाकडे- श्रीरामकडे राहण्यास गेल्या. परंतु त्यांची छाप- त्यांच्या आठवणी अचलपूरच्या विशेषत: पांढरपेशा स्त्रीजीवनावर आहेत. मुख्यत: सुबोध हायस्कूलच्या शिक्षिका म्हणून त्यांच्या विविध आठवणी अचलपूरला आहेत. त्यांनी किती वेगवेगळ्या स्वरूपाची कामे गावात करून ठेवली आहेत !
रतनबाई – तरुण विवाहितेचे शब्दचित्र
हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai - A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...
लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)
वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होते, परंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी / वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. ‘मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावे, अशी दादांची कार्यशैली असे...
‘निबंधमाला’कार विष्णुशास्त्री चिपळूणकर : व्यक्तिवेध
विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आधुनिक मराठी गद्याचे जनक आणि मराठी भाषेतील श्रेष्ठ ग्रंथकार होत. त्यांना ‘सामाजिक सुधारणेचा वाहता झरा’ ही उपमा दिली गेली. त्यांचे ‘निबंधमाला’ हे नियतकालिक फार गाजले. त्यांना अवघे बत्तीस वर्षांचे आयुष्य लाभले होते. तेवढ्या अल्प आयुष्यात त्यांनी साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अजोड आहे...
बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)
महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...
सुंदरबाई पवार – ब्रिटिशांच्या अफू धोरणाविरूद्ध लढा
ब्रिटिशांच्या अफूधोरणाच्या विरूद्ध लढा सुंदरबाई एच पवार या एका हिंदू - ख्रिस्ती महिलेने दिला. ब्रिटिशांनी अफूच्या व्यापाराला भारतात उत्तेजन देण्याचे जे धोरण स्वीकारले होते त्या विरूद्ध सुंदरबाईंनी खुद्द इंग्लंडात जाऊन तब्बल एकशेसोळा भाषणे दिली होती !
नर्मदा जीवनशाळा – आगळा शिक्षणप्रवाह
स्वतःमधील क्षमतांचा परिचय करून घेणे, त्या दिशेने पुढे चालणे व जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण करणे म्हणजे शिक्षण ! ते शिक्षण नर्मदाघाटीत मेधा पाटकरांच्या जीवनशाळा देतात. त्यांच्या या उपक्रमामुळे मुले हातात शस्त्र न घेता जीवनशाळांमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत. योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन कशा प्रकारे समाजाची उन्नती साधू शकते हे जीवनशाळेला भेट दिल्यावर जाणवते...
मेधा पाटकर व जीवनशाळा
आदिवासी समाज हा शहरी समाजापासून दूर, आडरानात राहतो. त्यांच्याकडे नैसर्गिक संसाधने असतात. सरकारने आदिवासी भागांमध्ये शाळा काढल्या आहेत, पण तेथे मुले येत नव्हती. उलट, जीवनशाळांमध्ये मुले हौसेने येतात. त्या जीवनशाळांना मेधा पाटकर यांचे मार्गदर्शन लाभते...