Home Tags राजकारण

Tag: राजकारण

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

0
मराठी संस्कृतीचा झळाळता प्रासाद राजकारण, समाजकारण, नाटक, वक्तृत्व आणि पत्रकारिता या पाच प्रमुख स्तंभांवर तोललेला आहे. महाराष्ट्रात कर्तृत्वसंपन्न व्यक्ती त्या एकेका क्षेत्रात होऊन गेलेल्या आहेत. पण एकाच व्यक्तीच्या अंगी हे सारे पैलू असलेली प्रतिभावान व्यक्ती म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे ...

राहुल गांधी यांचे महत्त्व सद्यस्थितीत आहे काय?

राहुल गांधी यांनी त्यांच्या आयुष्याशी जोडलेले सारे गौरवास्पद संदर्भ त्यांच्या समर्थनासाठी किंवा प्रचारासाठी वापरण्यास कायम नकार दिला. ही एकच गोष्ट आत्ताच्या सत्तेसाठी भिंत बनून उभी आहे. हिंदुत्वाला उत्तरेत उधाण आलेले असताना दक्षिणेने सातत्याने प्रागतिक भारतीयत्वाला स्वीकारलेले दिसून येते...

दादांच्या स्मृतिग्रंथात शालिनीताई अनुपस्थित !

वसंतदादा हे असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतेच, पण शालिनीताई यांचेही कार्यकर्तृत्व स्वतंत्रपणे विचारात घ्यावे लागेल. त्या महाराष्ट्रातील एक माजी मंत्री, माजी खासदार व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्या होत्या. त्यांनी राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्याविषयीची माहिती पुस्तकात असणे आवश्यकच होते...

लोकनेता वसंतदादा (Vasantdada Patil – Man of the Masses)

वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते अल्पशिक्षित होते, परंतु मुलींना मोफत शालेय शिक्षण, मुक्त विद्यापीठाची स्थापना, विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी / वैद्यकशास्त्राची महाविद्यालये काढण्याचा निर्णय यांमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. ‘मायबाप सरकार’ हा शब्दप्रयोग दादांना समोर ठेवूनच प्रचारात आला की काय असे वाटावे, अशी दादांची कार्यशैली असे...

बी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहिला आणि त्यात पराकोटीचा प्रामाणिकपणा, कठोर शिस्त आणि तत्त्वनिष्ठा हे निकष लावून काही लोकांची नावे नोंद करावी असे म्हटले तर ती यादी बी.जे. खताळ या नावापासून सुरू होण्यास हवी. त्यांनी राज्याच्या विविध मंत्रिपदांवर बहुतांश काळ काम केले. त्यांनी निवृत्तीनंतर स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन-चिंतन यांत गुंतवून घेऊन वयाच्या एकशेएकाव्या वर्षापर्यंत विविध विषयांवर लिखाण केले...

‘मर्मभेद’ पुस्तक कोणाचे? .(Who is the author of the book, ‘Marmbhed’?)

‘मर्मभेद’ ही राजकारणाची कटकारस्थाने अशी कथा असलेली कादंबरी. ती मानवी प्रवृत्ती-विकृती, रूपकात्मक-प्रतीकात्मक अशा मांडणीतून उलघडत जाते. कथेची भाषाशैली संस्कृतप्रचुर, जड असली तरी तिच्या भावनानुसारी प्रवाहीपणामुळे वाचकाला संमोहित करत गुंतवून ठेवते...

साहेब कोणी कोणाला म्हणावे? (What does word saheb mean?)

पंकजा मुंडे वडिलांचा उल्लेख मुंडेसाहेब असा करतात, सुप्रिया सुळेही वडिलांचा उल्लेख तसाच साहेब म्हणून करतात, राजकीय नेते एकमेकांना विधानसभेत साहेब म्हणतात व कार्यकर्तेही त्यांच्या नेत्यांना साहेब म्हणतात. हे नवीनच विचित्र नाव पुढे आले आहे...

आयत्या बिळावरील जातीय संस्था !

जे वर्षानुवर्षे चालू आहे ते जातीचे मोठेपण आपण कधी घालवणार? ओबीसी, मराठा, कुणबी, धनगर, ब्राह्मण या सर्वांना त्यांच्या त्यांच्या जातींच्या पंखांखाली राहून सरकारी फायदे व राजकारणातील जागांवर डोळा ठेवणेच आवडते. त्यासाठी मोर्चे, धरणे करण्यावर त्यांचा भर जास्त असतो. निदान शिक्षणाच्या बाबतीत तरी सर्व जाती-धर्मांतील मुलांनी या व्याधीपासून दूर राहून स्पर्धात्मक परीक्षांत पुढे येण्यास पाहिजे...