Home Tags रमेश भारदे

Tag: रमेश भारदे

शेवगावचे रमेशसर – विविधांगी कर्तृत्व

शेवगावचे रमेश भारदे यांना शिक्षणसम्राट होणे सहज शक्य होते, तसे राजकीय संबंधही त्यांचे होते; पण ते शिक्षक झाले ! आणि नंतर सेवाभाव, ध्येयनिष्ठ असे शिक्षणसंस्था चालक बनले. त्यांच्या या कर्तबगारीचा केवळ शेवगाव नव्हे तर नगर जिल्ह्यावर एक वेगळा ठसा उमटला आहे. रमेश भारदे यांनी ज्ञानदानाचे व्रत अखंड जपले...

शेवगावच्या साहित्य चळवळीचा मानबिंदू – महात्मा सार्वजनिक वाचनालय

न्या. महादेव गोविंद रानडे यांनी 1885 साली स्थापन केलेले महात्मा सार्वजनिक वाचनालय हे शेवगावच्या साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरले आहे. बाळासाहेब भारदे यांनी वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यास वैभव प्राप्त करून दिले. वाचनालयात पन्नास हजारांहून अधिक ग्रंथ तर तीस दैनिके, सोळा साप्ताहिके, सहा पाक्षिके आणि वीस मासिके अशी संपदा आहे...

बाळासाहेब भारदे यांची काँग्रेसनिष्ठा…

बाळासाहेब भारदे यांची कुशल राजकारणी, गांधीवादी नेता अशी ओळख आहे. त्यांना इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांची साथ सोडून मुख्यमंत्री व्हावे असा निरोप दिला. बाळासाहेबांनी काळाची पावले ओळखून पदत्याग केला, परंतु निष्ठा सोडली नाही...