Home Tags मुस्लिम सत्यशोधक मंडळ

Tag: मुस्लिम सत्यशोधक मंडळ

हमीद दलवाई व मुस्लिम सत्यशोधक मंडळ (Hamid Dalwai, the Founder Of Muslim Reformists Movement)

‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना पुण्यातील ‘साधना’ साप्ताहिकाच्या आंतरभारती सभागृहात 22 मार्च 1970 रोजी झाली. ‘साधना’ साप्ताहिक हमीद दलवाई आणि ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ यांच्या पाठीमागे सतत खंबीरपणे उभे राहिले आहे. हमीद दलवाई यांना ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’च्या स्थापनेनंतर कार्य करण्यासाठी मोजून पाच-सात वर्षे मिळाली. दलवाई यांचे निधन अकाली, 3 मे 1977 रोजी झाले. यदुनाथ थत्ते, ग.प्र. प्रधान, नरेंद्र दाभोळकर हे ‘साधने’चे जुने आणि विद्यमान संपादक विनोद शिरसाट यांनी दलवाई व मंडळ यांच्यासाठी गेल्या पाच दशकांत केलेले कार्य मोठे व महत्त्वपूर्ण आहे...

मुस्लिम लोकसंख्यावाढीची समीकरणे

लेखकाने इस्लाम हा कुटुंबनियोजनाचे केवळ समर्थन करत नाही, तर इस्लामनेच मर्यादित कुटुंबाचा आदर्श सर्वप्रथम दाखवून दिला आणि इस्लाम हाच त्या संकल्पनेचा आरंभकर्ता आहे असे म्हटले आहे व त्याचा तपशील दिला आहे...

सय्यदभाई – तिहेरी तलाक विरुद्धचा लढा

0
सय्यदभाई यांनी मुस्लीम समाजातील पुरुषसत्ताक ‘तिहेरी तलाक’विरुद्धचा लढा 1990 च्या दशकात आणि एकविसाव्या शतकातही चालूच ठेवला. त्यांनी तिहेरी तलाकमुळे मुलांसह घरी परत आलेली बहीण खतिजा हिचा जगण्यासाठीचा संघर्ष जवळून पाहिला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी मुस्लिम समाजातील धार्मिक कर्मठपणाविरुद्ध लढा दिला. मुस्लिम समाजाचे प्रबोधन हे त्यांनी आयुष्याचे ध्येय मानले होते...