Home Tags मंथन

Tag: मंथन

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती शक्य आहे? (Eco-Friendly Ganesh Idol – An Illusion)

महाराष्ट्रात काही चर्चाविषय कधीच संपत नाहीत, कारण त्यावर रास्त निर्णय केला जात नाही. गणपतीच्या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’मधील मूर्ती व पर्यावरण हा तसाच एक विषय. या संबंधातील गेल्या वीस वर्षांतील घटनांचा आढावा घेऊन वस्तुस्थिती काय आहे ते पेणचे गणेश मूर्तिकार श्रीकांत देवधर यांनी या लेखात मांडले आहे. पर्यावरणप्रेमी लोकांनी लेखातील मुद्दे जाणून घेऊन त्यांची निरीक्षणे वेगळी असतील तर जरूर मांडावी. मात्र त्यास वास्तवाचा आधार असावा...

ऊसतोड कामगार आणि त्यांची गाथा

4
राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत. ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली, त्यासोबत साखर कारखाने निघाले. शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा एक मोठा समुदाय. मात्र तो समुदाय म्हणजे असे मजूर की जे जी जागा मिळेल, जसे खाणेपिणे असेल, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत राहतात. त्यांचा स्वत:चा पसारा असा काहीच नसतो, पण जो आहे त्यावर त्यांना ऊसतोडणीच्या हंगामाचे पाच-सहा महिने काढायचे असतात. त्यांच्या अडचणी मात्र सुटताना दिसत नाहीत...

नास्तिक आहे… म्हणूनच मस्त जगतो !

ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल स्पष्ट भूमिका घेणारे लोक जगात फार थोडे असतात; परंतु देव आहे की नाही याबाबत विचार करणारे लोक भरपूर असतात. किंबहुना, अगदीच भाविकभाबडे लोक वगळले तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रसंगी ‘देव मदतीला येईल का ? पण देव असेल तरच ना !’ असा प्रश्न उद्भवत असतो. त्याचे प्रमुख कारण माणसाची दुर्बलता व म्हणून हतबलता हेच असते. तथापि काही कणखर माणसे कोणत्याही संकटप्रसंगी मनाचा निर्धार कायम ठेवून केवळ बुद्धीने विचार करून निर्णय घेतात. अशाच बुद्धिनिष्ठ, तार्किक विचार करण्याची शक्ती कमावलेल्या लेखकाने तो नास्तिक कसा बनत गेला याची कहाणी येथे सांगितली आहे...

निसर्गसंरक्षण : लोकसहभागातून की जुलूम-जबरदस्तीने? – व्याख्यान

‘निसर्गसंरक्षण : लोकसहभागातून की जुलूम-जबरदस्तीने?’ या विषयावर ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ पद्मभूषण माधव गाडगीळ यांचे ऑन लाइन व्याख्यान ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर झाले. ते युट्युबवर उपलब्ध आहे. त्यामध्ये त्यांची मुख्य मांडणी अशी होती, की वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली वनविभागाला अमर्याद अधिकार देऊन, वनालगत राहणाऱ्या लोकांवर निसर्गसंरक्षण लादण्यापेक्षा, ग्रामसभांना अधिकार देऊन त्यांच्यावर निसर्गसंरक्षणाची जबाबदारी सोपवावी...

माझ्या आईच्या आत्म्याची यात्रा !

मनाची पोकळी खूपच मोठी असते. विश्वाच्या व्यापाएवढी. तशी ती भरून काढणे फार अवघड. मनुष्य कितीही विज्ञाननिष्ठ असला तरी तो कोठेतरी थांबतोच. त्याला अजून पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव असते- प्रसंगाप्रसंगाने होते. ती पोकळी भरून काढण्याची शक्ती ज्याच्या त्याच्या श्रद्धेवर अवलंबून असते. काहींना श्रद्धा ह्या निरूपद्रवी अंधश्रद्धाच वाटतात. परंतु या श्रद्धा म्हणा- अंधश्रद्धा म्हणा, त्यांचा मनाला मोठा आधार असतो...

भीतीचे/धास्तीचे ग्रहण सुटत आहे !

0
सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हा पृथ्वी-चंद्र-सूर्य यांच्या अवकाशातील स्थानांमुळे होणारा वैश्विक खेळ आहे. निसर्गनिर्मित असलेला हा खेळ मनुष्यवस्ती पृथ्वीवर येण्याआधीपासून अव्याहत सुरू आहे. सूर्यग्रहणाने ‘दृष्टी’ वैज्ञानिक केली आणि समाजातही वैज्ञानिक जाणिवा मंदगतीने का होईना पण जागृत होत जातील असा विश्वास वाटतो...

आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य

0
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...

विधवा सन्मान ही मलमपट्टी !

0
महिलेला पतीच्या निधनानंतर भेडसावणारी खरी समस्या आर्थिक बाबतीतील असते. तिला अलंकार घालण्याची मुभा देणे ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. एखाद्या सरकारी परिपत्रकामुळे तिच्यावरील अन्यायाची चौकट खिळखिळी होणार नाही. विधवांना आर्थिक स्थैर्य व त्यांचे सांपत्तीक हक्क मिळवून देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष संवाद, प्रसारमाध्यमे, वैयक्तिक वागणुकीची उदाहरणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी समाज परिवर्तनाचे प्रयत्न करावे लागतील...

हेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले! (Herwad Village is charged with reforms for better treatment...

समाजाच्या चौकटी मोडणे सहजशक्य नसते परंतु संपूर्ण गाव एकत्र आले तर काय करू शकते, याचा आदर्श हेरवाडच्या ग्रामस्थांनी विधवा प्रथा निर्मूलन ठराव संमत करून घालून दिला आहे. त्यांनी विधवांच्या मुक्तीचे दार उघडले आहे. ‘गाव करेल ते राव काय करील’ ही उक्ती हेरवाडकरांनी सार्थ ठरवली आहे...

आयत्या बिळावरील जातीय संस्था !

जे वर्षानुवर्षे चालू आहे ते जातीचे मोठेपण आपण कधी घालवणार? ओबीसी, मराठा, कुणबी, धनगर, ब्राह्मण या सर्वांना त्यांच्या त्यांच्या जातींच्या पंखांखाली राहून सरकारी फायदे व राजकारणातील जागांवर डोळा ठेवणेच आवडते. त्यासाठी मोर्चे, धरणे करण्यावर त्यांचा भर जास्त असतो. निदान शिक्षणाच्या बाबतीत तरी सर्व जाती-धर्मांतील मुलांनी या व्याधीपासून दूर राहून स्पर्धात्मक परीक्षांत पुढे येण्यास पाहिजे...