कुसुमावती देशपांडे यांची कवयित्री, कथाकार व समीक्षक अशी मराठी साहित्यसृष्टीत ओळख आहे. त्यांचा इंग्रजी व मराठी वाङ्मयाचा व्यासंग विलक्षण होता. त्यांनी त्या काळी कुटुंबियांचा विरोध डावलून कवी अनिल यांच्याशी केलेला प्रेमविवाह चर्चेचा विषय बनला. त्या दोघांचा त्या काळातील पत्रव्यवहार ‘कुसुमानिल’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे…
रा.श्री. जोग यांची ओळख मर्मज्ञ समीक्षक अशी साहित्य विचारक्षेत्रात आहे. जोग यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ या ग्रंथाने मराठी साहित्य विचाराचा पाया घातला गेला. त्यांनी त्या ग्रंथात पाश्चिमात्य साहित्य, इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे संस्करण केले. जोग यांनी अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य विचाराला प्रदान केली...
श्री.के. क्षीरसागर म्हणजेच श्रीकेक्षी हे निर्भय आणि नि:स्पृह वृत्तीचे समीक्षक होते. ते सावरकर आणि पटवर्धन यांच्या भाषाशुद्धीविषयक विचारांवर ‘सह्याद्री’ मासिकातून परखड टीका केल्याने प्रकाशात आले. त्यांनी भाई डांगे यांच्या मार्क्सवादी भूमिकेवर व साने गुरुजी यांच्या उपदेशप्रधान वाङ्मयीन भूमिकेवरही टीका केली...
कवी अनिल यांना मुक्तछंदाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांनी ‘दशपदी’ या नव्या काव्यप्रकाराचा आविष्कार केला. साधी, सरळ, भावस्पर्शी रचना आणि उत्कट गीतात्मता हे त्यांच्या कवितेचे वेगळेपण. मात्र, त्यांची कारकीर्द विविधतापूर्ण आहे…
द. रा. कापरेकर हे श्रीनिवास रामानुजन् यांच्यानंतरचे जागतिक कीर्तीचे गणितज्ज्ञ. ते मराठी आहेत याचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1905 ला...