Home Tags परतवाडा

Tag: परतवाडा

परतवाडयाचे सव्वाशे वर्षांची परंपरा असलेले श्री विठ्ठल मंदिर

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली जुळी शहरे होत. परतवाडयात आधी लष्करी छावणी होती. त्यानंतर कालांतराने तेथे गाव वसले. त्या परतवाडयाच्या वकील लाईन या परिसरात शहरातील सर्वात जुने अशी ओळख असलेले श्री विठ्ठल मंदिर आहे.

गाईगोधन परंपरेचे हनवतखेडा

हनवतखेडा हे अचलपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले टुमदार असे गाव आहे. गावाच्या मधोमध असणारे नागद्वार मंदिर संस्थान, नदीपलीकडे असणारे दत्तझिरी मंदिर प्रसिद्ध आहे. गावातील उत्तम शरीरसौष्ठव व उत्कृष्ट सजावट असणाऱ्या गार्इंच्या मालकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते...

अचलपूर येथील गाढवपोळा

पोळा हा सण बैलांचाच, परंतु अचलपूर येथे भोई समाजात गाढवांचा पोळा आयोजित केला जातो. गाढवांप्रती कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे गाढव पोळा होय. ही प्रथा मागील पन्नास-साठ वर्षांपासून परतवाडा शहरातील दयाल घाट येथे जपली जात आहे...

जुळे हनुमान, हिंदू-मुस्लिमांना प्रिय !

जुळे हनुमान मंदिर अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यात येते. मंदिरातील जुळ्या हनुमान मूर्ती हिंदू व मुस्लिम, दोन्ही संस्कृतींत श्रद्धेने पूजल्या जातात ! आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भागातील मुस्लिम बंधू ‘हनुमान’ ही त्यांच्या जातीतील देवता आहे असे म्हणतात. त्यामुळे जुळे हनुमान मंदिर मुस्लिम बांधवांनाही हिंदूंएवढेच वंदनीय आहे...

अनाथांचा बाप – शंकरबाबा पापळकर (Achalpur’s Papalkar adopted hundred children!)

गाडगेबाबांनानंतरच्या पिढ्यांनी पाहिलेले नाही; परंतु गाडगेबाबांच्या समाजसेवेचा आदर्श घेतलेला, स्वत:च्या ऐषआरामाच्या जीवनावर पाणी सोडून अनाथांसाठी त्यांचे आयुष्य दान देणारा, मातृहृदयी, कृतिशील बाप बघायचा असेल तर तो शंकरबाबांमध्येच बघता येतो ! अचलपूरचे शंकरबाबा पापळकर ! त्यांची वैचारिक जातकुळी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशी जमते, म्हणून ते रोज बुद्धाचे स्मरण करतात.
carasole

गाविलगड – वैभवशाली बांधकामाचा बलदंड किल्‍ला

गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला बलदंड किल्ला विदर्भाचे भूषण आहे. तो किल्ला अमरावतीतील चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या चिखलदरा तालुक्यातील पठाराच्या दक्षिणेस सुमारे पाच कि.मी. अंतरावर स्थित आहे...
carasole

मेळघाटातील खोज आणि बंड्या साने!

मनगटात जाड पितळी कडं. खादीच्या सदर्‍याच्या सरसावलेल्या बाह्या. डोक्याला बांधलेला गमछा. राठ काळी-पांढरी दाढी. आणि हिंदी-मराठी मिश्र बोली. मेळघाट नामक दुर्गम आदिवासी भागात प्रश्न सोडवण्यासाठी उलाढाल्या करणारं व्यक्तिमत्त्व. नाव-बंड्या साने. काम-कार्यकर्ता. तो गेली पंधरा-वीस वर्षे मेळघाटमध्ये तळ ठोकून आहे. ‘खोज’ ही त्याची संस्था...