Home Tags जाखडी नृत्य

Tag: जाखडी नृत्य

दापोलीचा प्रभुआळी उत्सव – परंपरेची मांदियाळी

1
प्रभुआळी हे दापोली शहराचे मध्यवर्ती ठिकाण. त्या आळीची ख्याती उत्सव, प्रथा-परंपरा यांचा वारसा जपणारा, गजबजलेला भाग म्हणून आहे. प्रभुआळी हे नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी प्रधान व सुळे हे प्रभू म्हणजे सीकेपी ग्रामस्थ यांचे वास्तव्य होते. या जुन्या संदर्भाखेरीज दुसरा महत्त्वाचा पदर आहे. तो म्हणजे आळीत असलेले ‘प्रभू’ श्रीरामचंद्राचे मंदिर ...

निलेश उजाळ यांना ओढ कविता-गीतांची

निलेश उजाळ यांनी ते चौथीत असताना काटकर वाडीच्या जाखडी नृत्यामधून गायकी सुरू केली. छोटा कलाकार गात आहे म्हणून पंचक्रोशीतील लोक त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी करत. गुरूंनी लिहिलेली गाणी गाणारा निलेश, पुढे स्वतः गाणी लिहू लागला. तेच निलेश उजाळ कवी, गीतकार म्हणून टीव्ही माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत...

दापोली तालुक्यातील शाहीर उदय काटकर

शाहीर उदय काटकर यांनी जाखडी नृत्याची छाप पहाडी आवाजाच्या जोरावर महाराष्ट्रभर उमटवली. त्यांचे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे वक्तृत्त्व आणि बहारदार गायकी लोकांच्या मनावर गारुड करते. उदय काटकर यांनी हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत...

हिरव्या डोंगरांनी वेढलेले पिसई

चहुबाजूंनी डोंगर आणि त्यांच्या मध्यात वसलेले गाव म्हणजे पिसई. अठरापगड जातीचे लोक गावात राहतात, तरी त्यांच्यामध्ये सामाजिक एकोपा आहे. हे गाव लोककलेच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. पिसईच्या गावकऱ्यांनी त्यांची लोकसंस्कृती टिकवून ठेवली आहे...