नामाच्या किंवा विशेषणाच्या आधी जोडल्या जाणाऱ्या ‘अ’ला असलेले सहा अर्थ ग्रंथित करणारा श्लोक असा आहे – तत्सादृश्यमभावश्च तदन्यत्वं तदल्पता । अप्राशस्त्यं विरोधश्च नञर्थाः षट् प्रकीर्तिताः ।।
सादृश्य – ‘अब्राह्मणः’ म्हणजे ब्राह्मणसदृश, ब्राह्मणासारखा दिसणारा, यज्ञोपवित धारण करणारा पण ब्राह्मण नव्हे.
अभाव – अस्तित्व नसणे. ‘अज्ञानम्’ म्हणजे ज्ञानाचा अभाव.
अन्यत्व – म्हणजे भेद. एखादी वस्तू जशी वाटते तशी नसणे.
‘अपट:’ – पट म्हणजे वस्त्र. वस्त्राहून भिन्न ते अपट.
अल्पता – थोडेपणा, कमी प्रमाणात असणे.
‘अबला’ – म्हणजे जिच्यापाशी अल्प बल आहे अशी. (कालिदासाच्या ‘मेघदुता’च्या दुसऱ्या श्लोकात यक्षपत्नीचा अबला असा उल्लेख आला आहे, त्याचा अर्थ अजिबात बल नसलेली असा नसून अल्पबल असलेली असा आहे.)
अप्राशस्त्य – प्रशस्तीस अपात्र / अयोग्य असण्याचा धर्म. ‘अकाल:’ म्हणजे अयोग्य काळ.
विरोध – विरुद्धभाव, प्रतिकूलता.
‘अशास्त्रीयम्’ – शास्त्रविरोधी.
(‘मेघदूत (पूर्वमेघ) …’ या पुस्तकातील परिशिष्टातून)
———————————————————————————————