Home Search
node - search results
If you're not happy with the results, please do another search
मिलिंदचे ध्येयासक्त ल. बा. रायमाने (Tribute to Principal L.B. Raimane of Milind College)
दलित साहित्याचे एक शिल्पकार आणि औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ल.बा. रायमाने यांचे अल्पशा आजाराने 6 डिसेंबर 2020 ला निधन झाले. त्यांचे वय पंच्याऐंशी वर्षे मृत्युसमयी होते.
अठराव्या शतकातील सुंता विधी! (Sunta Ritual Eighteenth Century)
अल्तापहुसेन रमजान नबाब यांचा सुंता विधीबाबतचा लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर वाचून एक किस्सा लिहावासा वाटला. हिंदुस्थानी माणसाने इंग्रजीत लिहिलेले पहिले पुस्तक आयर्लंडमध्ये अठराव्या शतकाअखेरीस प्रकाशित झाले (1794). साके दीन महोमेत या भारतीय माणसाने ते पुस्तक लिहिले होते. तो ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत कॅम्प फॉलोअर या हुद्यावर काम करत होता. ते पुस्तक पत्ररूपात आहे.
सुंता! नको रे बाबा तो अनुभव (Circumcision – Dreaded Experience)
ते दिवस अजूनही लख्ख आठवतात. अंगणाच्या कोपऱ्यात गाडलेला रांजण. आजूबाजूला वस्ती. साधेच राहणीमान असणारी, परंतु नीटनेटक्या लोकांची. आई-वडील, दोघेही शिक्षक.
हेलेन केलर आणि वाङ्मयचौर्य (Helen Keller was charged with plagiarism)
हेलेन केलर हे नाव परिचयाचे आहे ते स्नेहभावाचे प्रतीक म्हणून. अंध, मूक-बहिऱ्या असलेल्या त्या मुलीने तिच्या जन्मजात अपूर्णत्वावर मात केली; ती सर्वसामान्य माणसांपेक्षाही अधिक शिकली. पुढे, तिने सर्व जगातील मूक, बधिर आणि अंध यांच्या विकासासाठी कार्य केले. माणसे तिचे आत्मचरित्र वाचतात, प्रभावित-प्रेरित होतात. अधिकतर तिच्यासंबंधी लोकांच्या मनामध्ये अपार आदर असतो.
झाडीपट्टी रंगभूमीचा रंगमंच – प्रेक्षकांचे कुतूहल (Jhadipatti Drama stage: Unique development)
झाडीपट्टी नाटकांचे स्टेज (रंगमंच) हा विषय कायम कुतूहलाचा राहिलेला आहे. किंबहुना झाडीपट्टीत खुद्द नाटक, त्यातील नटनट्या हे जसे आकर्षणाचे व चर्चेचे विषय असतात, त्याप्रमाणे रंगमंच – त्याची व्यवस्था - त्यावरील पडदे – त्यानुसार पात्रांच्या हालचाली हादेखील प्रेक्षकांच्या कुजबुजीचा विषय असतो.
बागणी, काकाचीवाडी – एकत्र आणि विभक्त !(Communal harmony is the common feature of two...
काकाचीवाडी या माझ्या गावाचा इतिहास बागणी गावाशी जोडलेला आहे. काकाचीवाडीहे गाव पूर्वी वेगळे, स्वतंत्र नव्हतेच. बागणीमध्ये काकाचीवाडी, फाळकेवाडी, चंदवाडी, रोजावाडी व पांढरमळा ही गावे एकत्रित होती. ती गेल्या चार दशकांत स्वतंत्र झाली आहेत. ती सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात, कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेजवळ आहेत.
मिरीकरांचा सहा पिढ्यांचा इतिहास (Mirikar family depicts it’s six generation history into museum in...
अहमदनगर शहराजवळील मिरी या गावाचे सरदार यशवंतराव मिरीकर यांचा वाडा ब्रिटिशकालीन कारकिर्दीच्या खाणाखुणा घेऊन उभा आहे. यशवंतराव यांचे पणतू, गोविंद मिरीकर यांनी त्या वाड्याचे नूतनीकरण करून, तेथे वस्तुसंग्रहालय (म्युझियम) उभे केले आहे.
चांगभलं करणारं ‘पवतं’ (Sacred Thread for Public Good – Tradition)
‘पवतं’ बांधण्याची परंपरा कोकणसह महाराष्ट्रभर अनेक गावांत सुरू आहे. ‘पवतं’ म्हणजे पवित्र रक्षक धागा. हाताला गंड्याचा दोरा, कंबरेला करगोटा बांधतात तसे. पवत्यांचे उल्लेख वेगवेगळ्या पद्धतींसह आढळतात.
टांकांच्या फेकी (व्यंगचित्रे)- स्वतंत्र विचारांचा अंकुश (Takanchya feki- Book of old cartoons makes one...
वृत्तपत्रांतील टिकाटिप्पणीचा अग्रलेखांइतकाच महत्त्वाचा विभाग म्हणजे व्यंगचित्रांचा. अनेक वाचक तर अग्रलेख वाचत नाहीत, पण ते ‘आम्ही व्यंगचित्र बघतो’ असे सांगतात. व्यंगचित्रांची वर्तमानपत्रांतील परंपरा किती जुनी आहे असे कुतूहल जागे झाले ते ‘टांकाच्या फेकी’ या व्यंगचित्रांच्या पुस्तकामुळे.
‘श्रीमंत’ निसर्गातील ‘गरीब’ गाव (Kumshet – poor village in rich natural resources area)
कुमशेत हे नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील आदिवासी खेडे. ते तालुक्याच्या गावापासून पासष्ट किलोमीटर उंचीवर आहे आणि नगरपासून एकशेनव्वद किलोमीटर दूर. टेकडीवर वसलेले ते गाव, सभोवताली खोल दऱ्या, भोवती जंगल आणि श्वापदे.