सुलभा सावंत ‘महाराष्ट्रातील पहिल्या संबळवादक म्हणून ओळखल्या जातात. पहिल्याच का, तर त्या एकमेव स्त्री संबळवादक आहेत. त्यामुळे ‘सुलभा सावंत आणि संबळ हे समीकरणच होऊनच गेले आहे. त्यांचा स्वभाव लहानपणापासून धाडसी.
मुले सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळात सहसा शाळेमध्ये असतात, परंतु कोरोनामुळे ती घराघरांत बंदिवान झाली आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्या प्रत्येकाच्या घरी सह्याद्री वाहिनीने शाळा आणली आहे. पण ती शाळा दिलखुलास, हसरी, खेळकर आहे आणि मुले शाळेमध्ये मौजमजेत अभ्यास करत आहेत असे दृश्य पालकांना पाहण्यास मिळते.
संजीवनी पाटील नावाच्या मराठी महिलेने दुबईमध्ये मसाल्यांचा उद्योग करण्यासाठी ओम पीके (OMPK) ट्रेडिंग कंपनी स्थापन केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही शहरे, तालुके, खेडी यांतील महिलांच्या उद्यमशीलतेला वाव मिळण्याची शक्यता तयार झाली आहे.
गोंधळीसमाजाचे बांधव गोंधळी नाटक दीडशे वर्षांपासून वागदरी येथे करत आले आहेत. वागदरी हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील, सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. तेथे मराठी व कन्नड, दोन्ही भाषांचा वावर आहे. सर्व सण-उत्सवातील सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांत द्विभाषा सूत्र फार जाणवते.
विनीत पद्मावार गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कोयनगुडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेवर मुख्याध्यापक आहेत. भामरागड हा आदिवासीबहुल तालुका. तेथील आदिवासीपाड्यांत माडिया ही बोलीभाषा बोलली जाते. मुलांना प्रमाणभाषा समजत नाही. त्यामुळे शिक्षणात मुख्य अडसर भाषेचा येतो.
वैशिष्ट्यपूर्ण सूर्यनारायण देवालय हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या वागदरी येथे पाहण्यास मिळते. ते वास्तवात आहे शिवमंदिर, पण उगवत्या सूर्याची किरणे मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडत असल्यामुळे मंदिराचे सूर्यनारायण असे नाव पडले आहे. ते मंदिर वागदरीचे ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिराच्या खूप आधीपासून आहे. मंदिरात पुरातन शिवलिंग असून भलामोठा नंदी आहे.
मी मूळ मुलुंडची (मुंबई) आहे. माझा जन्म हुबळी येथे आणि संगोपन मुंबईमध्ये झाले. मी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य पदवी मिळवली आहे. मी मुंबईच्या लोअर परळमधील रिझलट्रिक्स पब्लिक्स इंडिया या कंपनीत काम करत होते.
सिंगापूरच्या प्रगतीला कोविद-19 ने खीळ घातली आहे. त्याचे व्यापार उद्योगावर फारच दूरगामी-निगेटिव्ह परिणाम होणार आहेत. सिंगापूर हे आशियामधील सर्वात प्रगत आर्थिक व्यवहाराचे केंद्र मानले जाते. सेवाक्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या सोयींसाठी जगातील सर्व राष्ट्रांमध्ये सिंगापूरचा क्रमांक सर्वांत वरचा आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज स्वत: ज्येष्ठ वद्य अष्टमीला ‘माझ्या जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।।’ असे म्हणत पंढरपुरास साडेसातशे वर्षांपूर्वी प्रस्थान ठेवते झाले. तेथपासून वारीची परंपरा सुरू झाली असे मानले जाते.