Home Search

node - search results

If you're not happy with the results, please do another search

लॉकडाऊन काळातील आगळेवेगळे शिक्षण!

राज्यातील ग्रामीण भागांत शाळा बंद, पण शिक्षण सुरू आहे! कोरोनामुळे सर्वत्र शाळांना सुट्ट्या आहेत. परंतु दीक्षा अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचत आहे. दीक्षा अॅपमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे नऊ हजार सातशेहून अधिक व्हिडिओज व स्वाध्याय उपलब्ध आहेत.

वटपौर्णिमा (Vatpaurnima)

सुवासिनी भारतीय परंपरेनुसारसौभाग्यवृद्धीसाठी वटसावित्रीचे व्रत करतात. त्यास आधार सत्यवान-सावित्रीच्या पुराणकथेचा आहे. कथेनुसार सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी मोठ्या भक्तीने यमराजाला संतुष्ट केले. तिच्या भक्तीमुळे पतीचे गेलेले प्राण परत आले.

बडोद्यातील विनाशकारी प्लेग, 1896 (KILLER PLAGUE 1896 IN VADODARA)

'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर महाराष्ट्र व मराठी माणूस यांबाबतची विविध तऱ्हांची माहिती आपल्याला संकलित करायची आहे. काही ऐतिहासिक महत्त्वाचा डेटादेखील गावोगावाहून, स्थानिक पातळीवरील प्रयत्नांतून उपलब्ध होऊ शकतो.

देवाघरची बाळे (Gifted Children)

ठाण्याचे रंजन जोशी यांचे घरच चित्रकलेचे आहे. ते स्वतः, त्यांच्या पत्नी विद्या, दोघेही जे.जे. इंस्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये प्राध्यापक होते. त्यांचा मुलगा आदित्य, सून गौरी; ती दोघेही चित्रकलेचे शिक्षण घेऊन जाहिरातक्षेत्रात कामे करतात. आदित्य-गौरी यांची आठ वर्षांची छोटी मुलगी इरा हिला तिच्या खोलीत चित्रे काढण्यास एक भिंतच्या भिंत आहे

अजित कुलकर्णी याचे ‘अनामप्रेम’ (Ajit Kulkarni and Anamprem)

नगरच्या अजित कुलकर्णीला सिनेनट आमीरखान याच्याबरोबर अर्धा-पाऊण तास घालवण्यास मिळाला होता. अजितला आमीरखानचे उमदेपण आवडले, तो सभोवतालचे जीवन जिव्हाळ्याने पाहतो व उत्सुकतेने प्रश्न विचारतो हेही जाणवले. त्याला आमीरखान आवडला, परंतु तो आमीरखानच्या भेटीमुळे एक्साईट झाला नाही.

शिरपूर पॅटर्न पाणी चळवळ बनू शकेल? (Shirpur Pattern)

मे महिना संपत आला तरी या, 2020 साली पाणीटंचाईच्या, गावागावांना टँकरने पाणी पुरवल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत! त्यांची जागा कोरोनाने व्यापली आहे हे खरे; परंतु त्याचप्रमाणे, पाऊस 2019 साली सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत रेंगाळला होता. काही प्रदेशांत तर महापुराने थैमान घातले होते.

जलसंवर्धनाचे एकात्म व सुदृढ प्रयत्न हवेत! (Water Scarcity: Integrated Efforts Needed)

स्टॉकहोम जलपुरस्कार माधव चितळे यांना 1993 मध्ये मिळाला. तो नोबेल पुरस्कारच मानला जातो. तो भारतात प्रथमच मिळत होता, तोही मराठी माणसाला! त्यामुळे आम्ही 'विज्ञानग्रंथाली'तर्फे त्यांचा सत्कार व त्यांची मुलाखत असा कार्यक्रम मुंबईत योजला. भा.ल.महाबळ व मीना देवल यांनी मुलाखत घेतली.

अपर्णा-विदुर महाजन यांचा ध्यास (Vidur-Aparna Mahajan: Art Loving Couple)

तळेगावचे विदुर आणि अपर्णा महाजन हे जोडपे प्रेमळ आणि लाघवी आहे. ती दोघे विचाराने आणि वृत्तीने वेगवेगळी व स्वतंत्र आहेत, पण परस्परांना पूरक आहेत. विदुर सतारवादक-अभ्यासक-संशोधक-प्रचारक आणि अपर्णा तळेगाव जवळच्या चाकण येथे कला व वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विषयाची प्राध्यापक व प्रमुख आहे.

जयंत खेर – वृद्धत्वी आनंद (Jayant Kher – Economist turned Painter)

'ग्रंथाली'मधून निर्माण झालेल्या आमच्या विशाल स्नेही मंडळात जयंत खेर हा वेगळा होता. तो स्टेट बँकेत उच्चाधिकारी होता. ती नोकरी सोडून तो खाजगी कंपनीत गेला. त्याचे वागणे-बोलणे शिस्तशीर, नेमस्त, तरी आग्रही असे.

डबीर यांची गझलगाथा (Dabir – Marathi Gazal Writer)

सदानंद डबीर हे आजच्या काळातले मराठीतील महत्त्वाचे गझलकार मानले जातात. माझा-त्यांचा त्यांच्या पहिल्या 'लहेरा' संग्रहापासूनचा परिचय. ते त्यावेळी रेल्वेत इंजिनीयर म्हणून नोकरी करत होते. परंतु कविता, विशेषत: गझल हे त्यांचे वेड वाढत गेले.