Home Search

शेती - search results

If you're not happy with the results, please do another search
_Chakote_1.png

चकोते समुहाचा प्रयोग सेंद्रीय शेतीचा

अण्णासाहेब चकोते यांनी महाराष्ट्र - कर्नाटकाच्या सीमेवरील मानकापूर येथे पन्नास एकर क्षेत्रात विविध प्रयोग सुरू केले आहेत. त्यांची ‘गणेश बेकरी’ यशस्वी झाली. त्यानंतर त्यांनी...
carasole

सेंद्रीय शेतीचे आग्रही – अरुण डिके

अरुण डिके हे इंदूरमध्ये ‘रंगवासा जैविक ग्राम संस्थान’च्या माध्यमातून सेंद्रीय शेतीचे नवनवे प्रयोग करत असतात. त्यांचा ध्यास नामशेष होत चाललेल्या बहुमोल पिकांचे बहुपीक लागवडीत...
carasole

शेतीची दुर्गती!

2
मराठा समाजाच्या मोर्च्यांमुळे महाराष्ट्रात खळबळ खूप माजली आहे. त्यासंबंधी चर्चा झडत आहेत. त्यामध्ये एक मुद्दा वारंवार येतो. तो म्हणजे शेतीला आलेली दुर्गती! मराठा समाज महाराष्ट्रात...
carasole

कासेगावची मांडवावरील डाळींब शेती

‘कासेगावी डाळींब’ म्हणून कासेगाव या गावाची डाळिंबे प्रसिद्ध आहेत. द्राक्षे, डाळींबे यांचे उत्पादन सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर परिसरातील शेतकरी घेतात. द्राक्षाचे पीक नाजूक आहे. हवामानातील...

म्हातारपणी जिद्दीने फुलवली शेती!

मी शाळेत होतो तेव्हा माझ्या वझरे गावची लोकसंख्या अवघी तीनशे होती. शेती हा सगळ्यांचा प्राण होता. माझ्या वडिलांची शंभर एकर शेते होती. त्यामुळे पंचक्रोशीतील...
carasole

संजय गुरव – कात्रणांच्‍या छंदातून शेतीपर्यंतचा प्रवास

संजय मारुती गुरव हे ‘सिक्युरिटी’ (वॉचमन) म्हणून काम करत. मात्र त्यांचा ओढा सेंद्रीय (शेती) उत्पादने याकडे होता. त्यांना १९९४ पासून वृत्तपत्रे, साप्‍ताहिके, मासिके यांमधून...

ज्ञानकमळ रांगोळी (Dnyankamal Rangoli)

ज्ञानकमळ नावाची एक रांगोळी प्रसिध्द आहे. त्या रांगोळीच्या मागे अंधश्रध्दा अशी होती, की ग्रहणाच्या काळात ज्ञानकमळ काढण्यास शिकले, की बुध्दी वाढते ! मी एका ग्रहणकाळातच ज्ञानकमळ रेखाटण्यास शिकले. या रांगोळीसाठी गणिती तत्त्व (मॅथेमॅटिकल फॉर्म्युला) वापरला जातो. मी माझे बालपण संपल्यानंतर कित्येक वर्षांत ते ज्ञानकमळ काढले नाही, पण तरी संख्यांचा तो क्रम पक्का डोक्यात बसला. शेकडो वर्षांपूर्वी कोणातरी पणजी वा खापरपणजीने हा क्रम ठरवून ज्ञानकमळाची रचना केली असणार, तिला संख्याज्ञान असेल का? की फक्त 1 ते 10 आकडे मोजता येत असतील? असे प्रश्न माझ्या मनात अनेकदा उठले...

स्वभाषा : संस्कृती व समाज यांच्यासाठी गरजेची ! (Society, it’s culture and the language)

मी माझा धाकटा मुलगा रघुराज याच्याकडे सिडनीला आलो आहे. मुलाची बायको - बीॲट्रिस ही मलेशियन-चायनीज-ऑस्ट्रेलियन आहे. म्हणजे तिचा जन्म मलेशियात झाला. ती दहा वर्षांची असताना लिंम कुटुंब, मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून ऑस्ट्रेलियात 1980 च्या सुमारास आले. हल्ली बऱ्याचशा मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येकी एक तरी मुलगा किंवा मुलगी परदेशात स्थायिक झालेले आहेत. त्यांतील काही जणांनी परदेशी मुलींशी लग्ने केली आहेत. तेव्हा भाषा टिकवायची कशी? हा मोठा प्रश्न आहेच...

रियाझुद्दीन अब्दुल गनी शेख यांचे वारीनृत्य

वारकरी संप्रदायातील हरीभक्त परायण राजुबाबा शेख यांनी वारीनृत्य महाराष्ट्रात लोकप्रिय केले. वारीनृत्याची कल्पनाच त्यांची. राजुबाबा कीर्तन, अभंगगायन लहानपणापासून करत, पण त्यांना वारीनृत्याची कल्पना गुजरातचे कलावंत शेखावत यांच्याकडून मिळाली. शेखावत त्यांच्या भवनीभवई प्रयोगात पितळी परातीत नृत्य करत गात; कधी तलवारीच्या पात्यावर त्यांचे नृत्य असे. राजुबाबा यांनी ताटलीत नाचत अभंग गाण्याचा प्रयोग सुरू केला. नंतर ते डोक्यावर कळशा/हंडे यांचे तीनचार थर घेऊन नृत्यगायन करत आणि भक्तिरसात डुंबून जात. त्यांचा तो खेळ लोकप्रिय झाला...

जामनेर – बागायती आणि सुसंस्कृत (Jamner – city with rich development and cultural activities)

जामनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका आहे. तो जळगाव शहरापासून साधारणपणे छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे. जामनेर तालुका पाचोरा, भुसावळ, बोदवड, जळगाव, बुलढाणा या गावांनी वेढलेला आहे. जामनेर तालुक्यात एकशेअठ्ठावन्न गावे आहेत. त्यांपैकी शेंदुर्णी, फत्तेपूर, तोंडापूर, कापुसवाडी, नेरी, पहूर, देऊळगाव, वाकडी ही मोठी अशी गावे आहेत. जामनेर हे गाव टेकडीवजा एका डोंगराच्या कोपऱ्यात पायथ्याशी वसले आहे. मात्र त्या डोंगराला सिद्धगड या भारदस्त नावाने संबोधले जाते. गाव सुखी, संपन्न आणि समृद्ध असे आहे. जामनेर गाव नदीमुळे दोन विभागांत विभागले गेले आहे- जामनेर आणि जामनेरपुरा. दोन्ही गावांना सांधण्यासाठी नदीवर दोन ठिकाणी पूल बांधलेले आहेत. नदीचे नाव कांग असे आहे...