Home Search
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ - search results
If you're not happy with the results, please do another search
थिंक महाराष्ट्रः प्रगतीची पावले
- दिनकर गांगल
‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पामध्ये साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोन्हींची कमी आहे. परंतु अशा स्वेच्छाप्रयत्नांमध्ये हे स्वाभाविकच आहे. मात्र लोकांना ही कल्पना भावते खूप,...
‘थिंक महाराष्ट्र’च्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त – ‘उत्सव चांगुलपणाचा’
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक माहितीसंकलनाची चळवळ उभारणा-या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचा सहावा वर्धापनदिन 'उत्सव चांगुलपणाचा' या कार्यक्रमाने ठाण्यात साजरा होत आहे....
चांगुलपणा अवतीभवती
श्रीकांत पेटकर यांनी “चांगुलपणा अवतीभवती” हे छोटेखानी पुस्तक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवरील काही निवडक लेखांचा संग्रह या स्वरूपात प्रकाशित केले आहे. पुस्तक ‘ग्रंथाली’ या मान्यवर संस्थेच्या देखरेखीखाली प्रकाशित झाले आहे, तर ‘थिंक महाराष्ट्र’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभलेली आहे. सामाजिक, कला आणि संस्कृती क्षेत्रात स्वतःला झोकून दिलेले परंतु प्रसिद्धीविन्मुख अशा व्यक्तींबाबत लेख या पुस्तकात आढळतात...
नवरात्रीतील देवीचे महात्म्य
नवरात्रीतील देवीचे महात्म्य भक्तिभावाच्या अंगाने फारच वाढले असले तरी गावोगावची देवळे प्रसिद्ध आहेत, ती तेथील प्रथापरंपरांमुळे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर अशी सांस्कृतिक माहिती आपण संकलित करत असतो. यांपैकी कोणत्याही लेखाबाबत वाचकांकडे जादा माहिती असेल किंवा कोणत्या नव्या देवस्थानावर सांस्कृतिक महत्त्वाच्या अंगाने लेखन करण्याची इच्छा असेल; तर info@thinkmaharashtra.com या इमेल पत्त्यावर लिहावे वा ‘थिंक महाराष्ट्र’च्या नंबरवर फोन (9892611767) करावा...
सुसंस्कृत संवेदनशील माणसांचे नेटवर्क शक्य आहे? (Needed network of well meaning educated people)
सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात संवेदनेचे नेटवर्किंग जाणीवपूर्वक साधले तर आज जाणवणाऱ्या अस्वस्थता, असहाय्यता, हतबलता या भावना नष्ट होऊ शकतील आणि एक सुसंस्कृत संवेदनापूर्ण रसिक समुदाय बांधला जाऊ शकेल अशा तऱ्हेचा अभिप्राय ‘ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय’ व ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या संस्थांनी स्वातंत्र्यदिनी योजलेल्या नागरिकांच्या सभेत व्यक्त झाला. मुख्यत: टेलिव्हिजन व सोशल मीडिया यांच्या द्वारा समाजात जो विखार, विषाद व नकारात्मकता अशा भावना पसरल्या जात आहेत त्या दुर्बल भावनांना चांगुलपणाचे, सज्जनतेचे नेटवर्क हेच उत्तर ठरू शकेल अशा शब्दांत सभेचा समारोप झाला...
निसर्गसंरक्षण : लोकसहभागातून की जुलूम-जबरदस्तीने? – व्याख्यान
‘निसर्गसंरक्षण : लोकसहभागातून की जुलूम-जबरदस्तीने?’ या विषयावर ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ पद्मभूषण माधव गाडगीळ यांचे ऑन लाइन व्याख्यान ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर झाले. ते युट्युबवर उपलब्ध आहे. त्यामध्ये त्यांची मुख्य मांडणी अशी होती, की वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली वनविभागाला अमर्याद अधिकार देऊन, वनालगत राहणाऱ्या लोकांवर निसर्गसंरक्षण लादण्यापेक्षा, ग्रामसभांना अधिकार देऊन त्यांच्यावर निसर्गसंरक्षणाची जबाबदारी सोपवावी...
विधवा स्त्री ही तर पूर्णांगिनी ! – परिसंवाद
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘स्त्री: स्वातंत्र्य, प्रथा आणि कायदे’ या विषयावर ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे ऑनलाइन परिसंवाद आयोजित केला होता (21 ऑगस्ट 2022). त्या परिसंवादाचा वृत्तांत ...
अठराव्या शतकातील सुंता विधी! (Sunta Ritual Eighteenth Century)
अल्तापहुसेन रमजान नबाब यांचा सुंता विधीबाबतचा लेख ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर वाचून एक किस्सा लिहावासा वाटला. हिंदुस्थानी माणसाने इंग्रजीत लिहिलेले पहिले पुस्तक आयर्लंडमध्ये अठराव्या शतकाअखेरीस प्रकाशित झाले (1794). साके दीन महोमेत या भारतीय माणसाने ते पुस्तक लिहिले होते. तो ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत कॅम्प फॉलोअर या हुद्यावर काम करत होता. ते पुस्तक पत्ररूपात आहे.
वाचकांना वारीचे आवाहन (Appeal to Contributors)
पंढरपूरच्याआषाढी वारी निमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर दोन दिवसांत चार लेख प्रसिद्ध केले आहेत. पैकी प्रज्ञा गोखले या सुशिक्षित वारकरी. त्या संत साहित्याने भाववेड्या होऊन गेल्या आणि त्यांनी तत्संबंधात विविध माध्यमांतून अभ्यासपूर्ण व भावनापूर्ण अनुभवपर कथन चालू ठेवली आहेत.
साहित्य संमेलन – उस्मानाबादने धडा शिकवला! (Sahitya Sammelan – Osmanabad teaches a lesson)
साहित्य संमेलनाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.