लातूर जिल्यातील तालुक्यांची यादी

सोबतच्या यादीतील तालुक्यावर क्लिक करून त्या तालुक्यातील लेख वाचता येतील.

  • लातूर
  • अहमदपुर
  • औसा
  • उदगीर
  • चाकूर
  • जळकोट
  • निलंगा
  • देवणी
  • शिरुरअनंतपाळ
  • रेणापुर

लातूर जिल्यातील लेख

लातूरची येळवस… अन् वलग्या वलग्या सालम पलग्या

येळवस म्हणजेच वेळा अमावस्या. तो सण हिरवाईचा अपूर्व सोहळा मानला जातो. तो पुराणात किंवा इतिहासात नाही, मात्र त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. तो सण 2024 साली 11 जानेवारी रोजी आला तेव्हा लातूर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती ! त्यामुळे ती वेळा आमावस्या धुमधडाक्यात साजरी झाली. शेताशेतांत माणसांची भरती आली ! वेळा आमावस्येच्या पहाटे घराघरात चूल पेटते. घरात तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग असा सगळा रानमेवा जमा झालेला असतो...

महाराष्ट्राच्या सीमेवरील होट्टलची बुट्टीजत्रा (Hottal fair brings Lingayats from three states together)

होट्टल गावाची ख्याती शिवमंदिरांचे गाव म्हणून सर्वदूर आहे. तेथे चार भव्यदिव्य शिवमंदिरे आढळतात- सिद्धेश्वर, रेब्बेश्वर, सोमेश्वर आणि परमेश्वर अशी त्यांची नावे. शिवमंदिरांची उभारणी अकराव्या शतकात झाली. नितांतसुंदर अशा शिल्पकलेने नटलेली अशी ती शिवमंदिरे आहेत. होट्टल ही कल्याणीच्या चालुक्यांची उपराजधानी होती. बदामी ही मुख्य राजधानी होती. होट्टलची बुट्टीजत्रा ही आगळीवेगळी आहे...

ऊसतोड कामगार आणि त्यांची गाथा

4
राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत. ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली, त्यासोबत साखर कारखाने निघाले. शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा एक मोठा समुदाय. मात्र तो समुदाय म्हणजे असे मजूर की जे जी जागा मिळेल, जसे खाणेपिणे असेल, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत राहतात. त्यांचा स्वत:चा पसारा असा काहीच नसतो, पण जो आहे त्यावर त्यांना ऊसतोडणीच्या हंगामाचे पाच-सहा महिने काढायचे असतात. त्यांच्या अडचणी मात्र सुटताना दिसत नाहीत...

अशोक ढवण – कुणबी कुळातील कुलगुरू

अशोक ढवण हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून विद्यापीठाचे कुलुगुरू झाले. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक व शेती क्षेत्रांत संशोधनापासून उपयोजनापर्यंतची अनेकविध कामगिरी करत असताना माणसामाणसातील जिव्हाळा जपला, साहित्याचे प्रेम राखले आणि सभोवतालच्या समाजजीवनाचा एकूण स्तर उंचावला...

स्थलांतर ऊर्फ घरवापसी! एक टर्निंग पॉइंट (Migration can be a Turning Point)

कोरोना व्हायरसमुळे लोकांची घरवापसी/स्थलांतर मोठ्या प्रमाणावार होत आहे. तो फार मोठा प्रश्न होणार आहे. मी त्या प्रश्नाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. वास्तवात इट्स रिस्टोरेशन इन रिअॅलिटी. मला मराठवाड्याच्या परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांची माहिती आहे. 
-gajananjadhav-latur

कातकरी-मराठी शब्दकोशाधारे शालेय शिक्षण – गजानन जाधव यांचा उपक्रम

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील गजानन जाधव हे डी एड झाल्यानंतर, शिक्षक म्हणून ‘रायगड जिल्हा परिषदे’त नोकरीस 2006 साली रूजू झाले. त्यांना रोहा...
-heading

अंबाजोगाईतील पुस्तक चळवळ

बीड जिल्ह्याच्या  अंबाजोगाईमधील ‘अनुराग पुस्तकालय’ हे केवळ पुस्तकाचे दालन नाही, तर विविधांगी वाचणास प्रेरणा देऊ पाहणारे ठिकाण आहे. अभिजीत जोंधळे यांचे कुटुंब तेथेच...
_Anitabainche_Bhashadalan_1.jpg

अनिताबाईंचे भाषादालन

अनिता जावळे जिल्हा परिषद शाळेमध्ये काम गेली पंधरा वर्षें करतात. त्यांनी शिक्षणसेवक म्हणून मार्च 2002 पासून कामाची सुरुवात केली. अनिताची पहिली शाळा होती, लातूर...
_Anandwadi_1.jpg

आनंदवाडी गावात स्त्रीराज!

आनंदवाडी गाव लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक तेथे बिनविरोध पार पडते. गावातील मंदिरात ग्रामपंचायत सदस्यांची निवड होते. गावक-यांनी गावात अभेद्य युतीतून काही...
carasole

‘विश्वेश्वर’ची चौफेर नजर!

आलमल्यासारख्या लातूर जिल्ह्यातील आड गावात शहरी शिक्षणाला लाजवेल असे शिक्षण आणि नैसर्गिक सानिध्य! जे जे शहरी शिक्षणात आहे ते सर्व व शिवाय, नव्याने आणखी...